दोन बायका असणाऱ्याना लाडकी बहिण योजनेचा लाभ नको

प्रकाश महाजन यांचे मत

दोन बायका असणाऱ्याना लाडकी बहिण योजनेचा लाभ नको

राज्यात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आहे. या योजनेचे सर्व स्तरातून स्वागत सुद्धा होत आहे. मात्र या योजनेवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या योजनेच्या लाभावरून महाजन यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. ज्या समाजात दोन पेक्षा जास्त लग्न झालेल्या महिला आहेत, ज्यांना दोन पेक्षा जास्त आपत्ये आहेत, अशा समाजाला या योजनेचा लाभ देता कामा नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाजन म्हणाले, विशेषतः मुस्लीम समाजाला या योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. कारण देश लोकसंख्येच्या एका विस्फोटावर असताना अशा पद्धतीने या योजनेचा लाभ ज्या घरात दोन बायका आहेत, आणि दोन पेक्षा जास्त आपत्ये आहेत, अशा कुटुंबांना देण्यात येऊ नये, असे ते म्हणाले. याशिवाय ते म्हणाले, या योजनेतील लाभासाठी रहिवासी दाखला रद्द करण्यात येऊ नये. केवळ आधारकार्ड, रेशनकार्डवर या योजनेचा लाभ दिला तर नको त्यांना याचा लाभ मिळेल.

हेही वाचा..

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबईच्या त्रैवार्षिक निवडणुकीत रत्नसिंधू पॅनलची बाजी

चीनमध्ये खासगी रॉकेटचा भीषण अपघात

‘राहुल गांधींना पूर्ण वेळ सभागृहात बसणे शक्य तरी होईल का?’

भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ बंद

ते म्हणाले, मुंबई असेल किंवा नवी मुंबई, कल्याण, ठाणे या परिसरात बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड सुद्धा आहे. जर का फक्त याच कागदपत्राच्या आधारावर या योजनेचा लाभ दिला तर अशा बांगलादेशींना या योजनेचा लाभ मिळेल त्यामुळे देशाचे नुकसान होईल, असेही महाजन म्हणाले.

Exit mobile version