25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेष‘निवडणूक रोख्यांवर टीका करणाऱ्यांना लवकरच पश्चाताप होईल’

‘निवडणूक रोख्यांवर टीका करणाऱ्यांना लवकरच पश्चाताप होईल’

पंतप्रधान मोदी यांचे विधान

Google News Follow

Related

‘ज्या व्यक्ती निवडणूक रोख्यांविरोधात आंदोलन करत आहेत, त्यांना लवकरच याचा पश्चाताप होईल. सन २०१४पूर्वी निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीचा माग लागत नव्हता. मी निवडणूक रोखे आणले. या निवडणूक रोख्यांमुळे आपण निधीचा माग काढू शकलो,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. कोणतेही गोष्ट परिपूर्ण नसते. त्रूटी दूर केल्या जाऊ शकतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

तमिळनाडूतील थांती टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. १५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांची योजना घटनाबाह्य ठरवून रद्द केली होती. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाला आणि निवडणूक आयोगाला सर्व रोख्यांचा तपशील जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाचे विरोधी पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले होते. सर्व निवडणूक काळात सर्वांत मोठा देणगी मिळवणारा पक्ष हा भाजप ठरला होता. त्याला अपवाद होती ती केवळ बिहारमधील सन २०२०ची निवडणूक.

हे ही वाचा:

‘३०० रुपयांसाठी सभेला आलो’

जलपैगुडीतील वादळात पाच ठार, ५०० जखमी!

ताजमहाल नाही पहिली पसंती अयोध्या!

गेल्या १० वर्षांत जे काही घडले ते केवळ ट्रेलर!

यावेळी देणगी मिळवणाऱ्या पक्षात भाजप चौथ्या क्रमांकावर होता.मोदी यांनी यावेळी अण्णा द्रमुकसोबतच्या आधीच्या युतीबाबतही चर्चा केली. ‘आमची मैत्री मजबूत होती. जर काही पश्चातापाची भावना असेल तर ती अण्णाद्रमुककडून अपेक्षित आहे, भाजपकडून नाही. अम्माची (अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता) स्वप्ने धुळीस मिळवून पाप करणाऱ्यांनी पश्चाताप व्यक्त करायला हवा, आम्ही नाही,’ असे मोदी म्हणाले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अण्णाद्रमुकने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी फारकत घेतली होती. दोन्ही पक्षांमध्ये मतभेत निर्माण होण्यास तमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई जबाबदार असल्याचा आरोप अण्णाद्रमुक पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. ‘केवळ निवडणुका जिंकणे हे माझे ध्येय असते तर मी ईशान्येच्या विकासासाठी काम केले नसते. सर्व माजी पंतप्रधानांनी एकत्रितपणे ईशान्येकडील राज्यांना जितक्या वेळा भेट दिली आहे, त्यापेक्षा मी अधिक भेट दिल्याचे मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा