काश्मिरी पंडित दरवर्षी नवरेह सण साजरा करतात, पण यंदाच्या या सणाचा जरा दिवस खास होता. कारण जवळपास ३२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर काश्मिरी पंडितांनी पुन्हा एकदा श्रीनगरमधील माता शारिका देवी मंदिरात पूजा केली. ज्यांना हिंसाचाराच्या वेळी पळून जावे लागले होते तेही या पूजेत सहभागी झाले होते.
यावेळी काश्मिरी पंडितांनी देवीची मनापासून पूजा केली. यासोबतच हिंसाचार झालेल्या पंडितांनी त्यांचे भूतकाळातील अनुभवही सांगितले. काश्मिरी पंडित हे हिंदू कॅलेंडरनुसार नवरेह म्हणून नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करतात. या कार्यक्रमाला खासदार सुब्रमण्यम स्वामी प्रमुख पाहुणे होते.
श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या ‘हरी पर्वत’ नावाच्या छोट्या टेकडीवर वसलेल्या माता शारिका देवी मंदिरात शनिवारी, २ एप्रिल रोजी वेगळेच दृश्य होते. तीन दशकांहून अधिक काळानंतर हा प्रसंग आला, जेव्हा काश्मिरी पंडित नवरेह निमित्त मातेची पूजा करत होते. या लोकांमध्ये डॉ रविश नावाच्या एका इसमाचा समावेश होता. त्याने माध्यमांना सांगितले की, ” ते त्यांच्या वयाच्या २० व्य वर्षापर्यंत शारिका देवीच्या मंदिरात पूजेसाठी नेहमी यायचे. त्यांनतर ९० च्या दशकात दहशतवादामुळे त्यांनी हे ठिकाण सोडले होते. मात्र हे ठिकण सोडले तरी फक्त शरीराने लांब होतो, ३२ वर्षांनी मंदिरात पुन्हा दर्शन घेऊन आनंद झाला. ”
हे ही वाचा:
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या
अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी
पाकिस्तानची संसद बरखास्त, ३ महिन्यांत पाकिस्तानमध्ये निवडणुका
काँग्रेसच्या ठाम भुमिकेपुढे शरद पवार नरमले? म्हणतात युपीए अध्यक्ष होण्यात रस नाही
हिंसाचाराच्या वेळी पळून गेलेल्या पंडितांनी काश्मीर खोऱ्यात पुन्हा स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हिंसाचाराचे बळी ठरलेल्या काश्मीरी पंडितांना पुन्हा नवरेह निम्मित पूजेसाठी सतीश मालदार यांनी आमंत्रित केले होते. या पूजेचे संपूर्ण आयोजन मालदार यांनीच केले होते.