सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार!

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पार पडणार सोहळा

सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिलीय जातो. ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार यापूर्वीच देण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (१ ऑगस्ट) दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सायंकाळी सहा वाजता हा सोहळा पार पडणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते मूर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सुधा मूर्ती यांनी ग्रामीण भागातील विकास तसेच साहित्य व सामाजिक क्षेत्रात भव्य योगदान दिले आहे. सुधा मूर्ती यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींकडून सुधा मूर्ती यांची नुकतीच राज्यसभेवर निवड करण्यात आली होती.

हे ही वाचा..

विधानपरिषदेतील नवनिर्वाचित ११ उमेदवारांनी घेतली शपथ !

सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

शिळफाटा अत्याचार, हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १ कोटीहून अधिक भगिनींचा सहभाग

ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराचे यंदा ४२ वे वर्ष आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Exit mobile version