अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर!

एआर रहमान आणि रणदीप हुडा यांनाही सन्मानित करण्यात येणार

अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर!

हिंदी सिनेसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आपल्या दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. दरम्यान, जेष्ठ अभिनेत्याला आणखी एक मोठा किताब मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच अमिताभ बच्चन यांच्यासह ऑस्कर विजेते एआर रहमान आणि रणदीप हुडा यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि अदिनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली.गेल्यावर्षी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला होता. यंदाचा हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राचा मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे.

हे ही वाचा.. 

रामनवमीनिमित्त अयोध्या नगरीत रामभक्तांची अलोट गर्दी

दाऊद छोटा शकील गँगच्या नावे एकनाथ खडसेंना धमकीचे फोन

कोलकात्याच्या सुनील नारायणची राजस्थानविरुद्ध दमदार खेळी

विहिंप नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन दहशतवाद्यांना अटक

दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने २४ एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.दीनानाथ नाट्यगृह येथे हा सोहळा पार पडणार आहे.मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.नाट्यसेवेसाठी अभिनेते अशोक सराफ, प्रदीर्घ चित्रपट सेवेसाठी पद्मिनी कोल्हापूरे,प्रदीर्घ नाट्य सेवेसाठी अतुल परचुरे, उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी रणदीप हुड्डा आणि पत्रकारितेसाठी भाऊ तोरसेकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

Exit mobile version