यंदा अयोध्या लक्षावधी दिव्यांनी उजळणार

यंदा अयोध्या लक्षावधी दिव्यांनी उजळणार

योगी आदित्यनाथांनी येत्या दिवाळीला शरयू तीरावर ७.५ लाख दिव्यांची आरास करण्याचे ठरविले आहे. उत्तर प्रदेशा राज्य सरकारने यंदाची दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरविले आहे.

उत्तर प्रदेश राज्य सरकारने २०२० मध्ये ५.५ लाख दिव्यांची दिवाळी साजरी केली होती. यंदा उत्तर प्रदेश सरकारचा हा विक्रम मोडित काढण्याचा विचार आहे. यंदाच्या दीपोत्सवाला तब्बल ७.५ लाख दिवे वापरण्याचा विचार असल्याचे कळले आहे.

याबाबत सरकारच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासाठी पर्यटन विभागाला तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव देखील देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

स्वरा भास्करच्या अजब तर्कावर ‘अरेस्ट स्वरा’ वायरल

‘हिंदू दहशतवाद’ म्हणणाऱ्यांना ‘या’ अभिनेत्रीने सुनावले खडे बोल

अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक

तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद

या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी ७,००० कार्यकर्त्यांची फौज देखील तयार करण्यात आली आहे. त्याबरोबरच या कार्यक्रमाची वारंवार उजळणी देखील करण्यात येणार आहे. असे देखील सरकारी प्रवक्त्यांकडून कळले आहे.

मागच्या दीपोत्सवा वेळी ललित कला अकादमी लखनऊच्या कलाकारांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांना प्रभू रामचंद्रांची २५ शिल्पे तयार करण्यास सांगितले होते. त्यासाठी रामायणातील विविध प्रसंगांची निवड करण्यात आली होती.

मागच्या दीपोत्सवा दरम्यान लखनऊ, वाराणसी, कानपूर, मथुरा आणि प्रयागराज येथील कलाकारांनी विविध कलाकृती फायबर, टेकाकोटा आणि लाकडापासून बनविल्या होत्या.

मागच्या दीपोत्सावासाठी संपूर्ण अयोध्या सजविण्यात आली होती. सर्व घाट, मंदिरे, इतकेच नव्हे तर घरांना देखील उजळवण्यात आले होते.

Exit mobile version