देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल!

स्कायमेटच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार पावसाचे प्रमाण कमी राहील

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल!

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी ९४ टक्के पाऊसमानाचा ‘स्कायमेट’चा अंदाज आहे. देशात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ९४ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊसमान राहणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खाजगी संस्थेने व्यक्त केला आहे.

अवकाळी पावसाने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ करणारे वृत्त आहे. स्कायमेटच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस ८५८.६ मिमी सरासरी राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे.

गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या प्राथमिक अंदाजानंतर स्कायमेट पुन्हा मान्सूनचा अंदाज देणार आहे. मात्र हा प्राथमिक अंदाज देशभरातल्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ‘अल निनो’चा परिणाम मान्सूनवर होण्याचे भाकित अमेरिकेच्या हवामान संस्थेनेही केले होते. आता स्कायमेटने देखील पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अद्याप भारतीय हवामान विभागाचा अंदाज आलेला नाही.

हे ही वाचा:

आता हिमंता बिस्वसर्मा राहुल गांधींना धडा शिकवणार, जाणार न्यायालयात

जमशेदपूरमध्ये गोळीबार, दगडफेक, पोलिसही जखमी… जमावबंदी कलम लागू

लिट्टेला सक्रिय करण्याचा कट , एनआयएची छापेमारी, मोठ्या प्रमाणावर रोकड ,ड्रग्ज जप्त

पावसापासून बचाव करण्यासाठी ते शेडखाली उभे होते, पण झाडाने जीव घेतला

भारतीय हवामान विभाग आपला अंदाज १५ एप्रिलला वर्तवेल, त्यावेळी अल निनो असेल तर त्याची माहिती समोर येईल. त्यानंतरच पावसाची स्थिती नेमकी काय राहील याबाबत काहीसा अंदाज येईल. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी देखील भारतीय हवामान विभागाचा एक अंदाज येतो, त्यानंतर यंदा पावसाबाबत योग्य स्थिती समजेल.

Exit mobile version