31 C
Mumbai
Sunday, November 3, 2024
घरविशेषकाश्मीर फाईल्स चित्रपटचे यश सामान्य नागरिकांचे

काश्मीर फाईल्स चित्रपटचे यश सामान्य नागरिकांचे

Google News Follow

Related

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमार्फत द काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या निमित्ताने एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी हे दोघे सहभागी झाले होते. चर्चगेट येथील मर्चंट्स चेंबर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी या संपूर्ण कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे श्रेय देशभरातील सामान्य नागरिकांना दिले आहे. हे यश माझे नसून देशातील सामान्य नागरिकांचे आहे, मी फक्त माध्यम होतो असे म्हटले आहे. हा चित्रपट यावा ही वेळ आली होती, हे होणारच होते. मी शिव आणि सरस्वतीचा उपासक असल्याने मला हा विषय मिळाला अशी प्रांजळ कबुली अग्निहोत्री यांनी दिली. हे यश श्यामाप्रसाद मुखर्जी, टिकालाल टपलू, निलकंठ गंज, गिरिजा टिकू, हुतात्मा झालेले हवाई दलाचे कर्मचारी या सगळ्यांचे आहे.

हे ही वाचा:

हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’

अभिषेक बॅनर्जी यांना ईडीची नोटीस

सीताराम कुंटेंची हकालपट्टी करा

काँग्रेस नेतृत्वावर ‘जी-२३’ क्षेपणास्त्राचा मारा

काश्मीरी पंडीतांना त्यांच्यावरिल अत्याचाराला ना कधी हिंसेने उत्तर दिले, ना कधी भडकाऊ भाषणे केली. त्यांनी आपल्या मुलांना सरस्वती उपासक बनवले. चांगले शिक्षण दिले. ते सर्व आज चांगल्या ठिकाणी सेटल आहेत. तर ज्यांनी अत्याचार केला ते हलाकीच्या परिस्थितीत आहेत.

हा चित्रपट बनवताना अनेक समस्या आल्या. योग्य माहितीची समस्या, नीट सरकारी नोंदी नाहीत. त्यामुळे RTI ना उत्तरे नीट नाहीत. आकडे चुकीचे. पंडीत लोक हे जगभर तुकड्यांमध्ये विखूरलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याची अडचण. पैसा कोण लावणार याची अडचण. पण असे असूनही या चित्रपटासाठी मी ७०० मुलाखती घेतल्या.

पण हेच जर मी ठरवले असते की मी काश्मिरी मुसलमानांवर चित्रपट बनवणार आहे. त्यात सैन्याने त्यांच्यावर कसे अत्याचार केले हे दाखवणार आहे. मग त्यासाठी मी सात मुलाखती जरी घेतल्या असत्या तरी अडचण आली नसती. स्टार मिळाले असते. पैसा मिळाला असता. आम्हीही खूप पैसा कमवला असता.

यावेळी बोलताना विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर ही राजकीय समस्या नसून ती एक कमर्शियल समस्या असल्याचे म्हटले आहे. काश्मीर हा अनेकांसाठी धंदा झाला आहे. जसा पॅलेस्टिन हा जागतीक पातळीवर झाला आहे. पण काश्मीर फाईल्स चित्रपटामुळे फरक पडत आहे. लोक आता पलायन शब्द न वापरता नरसंहार शब्द वापरू लागले आहेत असे अग्निहोत्री यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही चित्रपटाचा चांगला बोलबाला असून अमेरिकेत जेव्हा चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनींग झाले तेव्हा सामाजिक संस्था स्वयंप्रेरणेने जोडत गेल्या. लोकांनी क्राऊड फंडींगमधून टाईम्स स्क्वेअर इथे चित्रपटाची जाहिरात लावली. या निमित्ताने पहिल्यांदा टाईम्स स्क्वेअर येथे काश्मीरचा संपूर्ण नकाशा दिसला असे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा