दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू निवृत्त

दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू निवृत्त

जागतिक क्रिकेटमधील एक मोठं नाव, स्विंग किंग म्हणून प्रसिद्ध असा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटमधून निवृ्त्तीचा निर्णय़ घेतला आहे. त्याने काही वेळापूर्वीच स्वत:च्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची माहिती देत हे जाहीर केलं. त्याने यावेळी काही आठवणीतील फोटो आणि आपलं स्टेटमेंट ट्विट केलं आहे.

दक्षिण आफ्रीका संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज असणाऱ्या स्टेनने एक काळ गाजवला होता. भल्या भल्या दिग्गजांना तंबूत धाडणाऱ्या स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ६९९ विकेट्स घेतले आहेत. डेल स्टेनने शेअर केलेल्या निवृत्तीच्या संदेशात लिहिलं आहे, ’२० वर्ष सराव, सामना, विजय, पराभव या साऱ्यात अनेक आठवणी असून अनेकांच यासाठी धन्यवाद. मी आज अधिकृतरित्या निवृत्ती जाहीर करत आहे. सर्वांच पुन्हा एकदा धन्यवाद.’

डेल स्टेनने २००४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर हळू हळू एकदिवसीय संघात मग टी-२० संघातही डेलनं स्थान मिळवलं. विशेष म्हणजे तिन्ही फॉर्मेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जगातील काही खास बोलर्समध्ये स्टेनचा नंबर लागतो.

हे ही वाचा:

पैसे मोजता मोजता ‘आकडे’ अडकले

अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल

बाळासाहेबांच्या नावावर हडपलेल्या महापौर बंगल्यात बिल्डरांची गर्दी होते ते कसे चालते?

तालिबानी शाहिद आफ्रिदी?

डेल स्टेनने साऊथ आफ्रिकेकडून ९३ टेस्ट, १२५ वनडे आणि ४७ टी-२० सामने खेळले आहे. टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक ४३९  विकेट घेण्याचा विक्रम डेल स्टेनच्या नावावर आहे. तसेच आयपीएलमध्ये देखील ९५ मॅच खेळून डेल स्टेनने ९७ विकेट घेतले आहे.

Exit mobile version