महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. देश पातळीवरचे चित्र आशादायक आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवार म्हणाले, विशेष करून उत्तर प्रदेशमध्ये वेगळा निकाल जनतेने दिला आहे. यापूर्वी भाजपला तिथे जे यश मिळत होते त्यातील मताधिक्याचा आकडा मोठा असायचा. आता हा आकडा मर्यादित आहे. देशपातळीवर हिंदी भाषिक राज्यात अधिक लक्ष दिले तर उत्तरेकडील चेहरा बदलायला अनुकूल वातावरण आहे.
हेही वाचा..
उत्तर मुंबईतून भाजपाची मुसंडी, पियुष गोयल विजयी!
सांगलीमध्ये मविआला दणका देत विशाल पाटलांनी उधळला गुलाल
इंदूरमध्ये मतदारांची भाजपानंतर ‘नोटा’ला पसंती
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा धडा!
आजच्या निकालच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी आणि सीताराम येचुरी यांच्याशी मी चर्चा केली आहे. इंडिया आघाडीची बैठक कदाचित उद्या दिल्लीमध्ये होण्याची शक्यता आहे. या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचे पवार म्हणाले. राज्यात अनेक गोष्टी चांगल्या घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित पणाने लढली. यापुढे आम्ही असेच एकत्र राहून राज्याची सेवा करू, असेही पवार म्हणाले.