29 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेषन्यूझीलंडच्या 'या' खेळाडूला अर्धांगवायूचा झटका

न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूला अर्धांगवायूचा झटका

Google News Follow

Related

न्यूझीलंडचा माजी दिग्गज क्रिकेटर ख्रिस कॅर्न्स याच्या अडचणी वाढतच असून काही दिवसांपूर्वी ह्रदयावरील उपचार घेऊन घरी परतलेल्या ख्रिसला आता लकवा म्हणजेच पॅरालीसीसचा अटॅक आला आहे. सध्या ख्रिसला ऑस्ट्रेलियाच्या स्पायनल स्पेशलिस्ट रुग्णालयाता भरती करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

ख्रिस हा ऑस्ट्रेलियामध्ये राहत असून काही दिवसांपूर्वाच त्याला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्यांमुळे कॅनबरा येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ख्रिसला हृदयासंदर्भातील समस्या असल्याने त्याच्यावर मागील काही बऱ्याच शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या होत्या. पण काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती ठिक झाली होती. तो घरातल्यांची बातचीत देखील करत होता. त्याला घरी देखील पाठवण्यात आले होते. पण आता अचानक त्याला स्पाइनमध्ये स्ट्रोक आल्याने लकवा मारला आहे.

५१ वर्षीय ख्रिस न्यूझीलंड क्रिकेटमधील एक आघाडीचा अष्टपैलू म्हणून ओळकला जात असे. त्याने न्यूझीलंडकडून ६२ कसोटी, २१५ एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. १९८९ मध्ये डेब्यू केल्यानंतर तो २००६ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.  त्यानंतर त्याने स्काई स्पोर्टवर कॉमेंट्री देखील केली होती. निवृत्तीनंतर तो पत्नी मेल आणि मुलांसह ऑस्ट्रेलियातील कॅनबरा येथेच स्थायिक झाला होता. २००० साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी क्रिसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आपल्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये ३ हजार ३२० धावा करत २१८ विकेट्स घेतले आहेत. तर एकदिवसीय सामन्यात ४ हजार ९५० धावांसह २०१ विकेट्सच घेतले आहेत.

हे ही वाचा:

अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती

द एम्पायर या वेबसिरीजवर त्वरित बंदी घाला

…नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल

या हल्ल्याचा बदला घेऊ

ख्रिस कॅर्न्सचे वकील एरॉन लॉयड यांनी शुक्रवारी मीडियाशी बातचीत करताना ख्रिसच सध्या रुग्णालयात भरती असल्याची माहिती दिली. तसेत त्याच्यासाठी करत असलेल्या प्रार्थनांसाठी चाहत्यांचे धन्यवाद मानले. सोबतच ख्रिसला सध्यातरी पुन्हा ठिक होण्यास काही वेळ लागेल असंही लॉयडने सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा