फ्रेंडशिप डे च्या अँबेसेडरवर चीनमध्ये का आहे बंदी?

फ्रेंडशिप डे च्या अँबेसेडरवर चीनमध्ये का आहे बंदी?

आज एक ऑगस्ट असून हा ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आहे. हा दिवस जगभर फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का की या फ्रेंडशिप डे चा एक अँबेसेडर सुद्धा आहे आणि ते सुद्धा एक कार्टून कॅरॅक्टर. पण फ्रेंडशिप डे च्या या अँबेसेडरवर चीनमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे.

फ्रेंडशिप डे हा पहिल्यांदा १९५८ शाली पॅराग्वे या देशात साजरा करण्यात आला. जोईस हॉल नावाच्या एका उद्योजकाच्या डोक्यातून मैत्री दिन साजरा करण्याची कल्पना पहिल्यांदा यादी आणि तीही १९३० साली हॉलमार्क कार्डचे संस्थापक असलेल्या जोईस यांना मैत्री दिन साजरा करण्यासाठी विशेष दिवस असावा असे वाटले.

हे ही वाचा:

‘टेस्ला’ हवी आहे? करा अजून थोडी प्रतीक्षा

सिंधूस्थान झिंदाबाद!

…म्हणून साजरा झाला ‘मुस्लिम महिला हक्क दिन’

बीडीडीच्या पुनर्विकासाचा पुन्हा शुभारंभ

मैत्री दिनाचा हा प्रवास सुरू झाल्यापासून संयुक्त राष्ट्रसंघाने १९८८ साली विनी द पूह या कार्टून कॅरॅक्टरला मैत्री दिनाचे अँबेसेडर म्हणून घोषित केले. पण विनी द पूह या कार्टून कॅरेक्टरवर चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पूह चे कार्टून, चित्रपट आणि खेळणी यांच्यावर चीनमध्ये निर्बंध घालण्यात आला आहे. पूह या कार्टून कॅरेक्टरशी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तुलना करून त्यांची खिल्ली उडवल्यामुळे चीन सरकारने हा निर्णय घेतला.

शी जिनपिंग हे २०१३ साली अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांचा आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या वेळी पूह या कार्टून कॅरेक्टरचाही फोटो जिनपिंग यांच्या फोटोसोबत जोडून त्यांची तुलना करण्यात आली होती. तर अशाच प्रकारची तुलना ही जपानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष शिंझो आबे यांच्या भेटीच्यावेळीही झाली होती. हे ट्रॉलिंग पाहून चीनचे राष्ट्रप्रमुख जिनपिंग यांना सहन न झाल्याने त्यांनी चीनमध्ये पूह या कार्टून कॅरेक्टरवर बंदी घातली.

Exit mobile version