वीरेंद्र सेहवागने शिवजयंतीनिमित्त केले हे ट्विट…

वीरेंद्र सेहवागने शिवजयंतीनिमित्त केले हे ट्विट…

संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. कोरोनाचे सावट असले तरी शिवभक्तांध्ये जयंतीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. विविध नेते, अभिनेते, खेळाडू छत्रपतींना अभिवादन करणारे ट्विट करत आहेत. भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने छत्रपतींना अभिवादन करणारे खास ट्विट केले आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची माहितीसुद्धा त्याने ट्विटमधून सांगितली आहे.

सेहवागने शिवछत्रपतींच्या जयंतीदिनी खास ट्विट केले. या ट्विटमध्ये सेहवागने म्हटलंय, “इतिहास आपल्याला सांगतो की सामर्थ्यवान लोक सामर्थ्यवान जागांवरून येतात. पण इतिहास चुकीचा होता! सामर्थ्यवान लोकं जागांना शक्तिशाली बनवतात.”

हे ही वाचा:

“पेंग्विन पाहायला या, पण शिवजयंतीला एकत्र आलात तर खबरदार”-आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

वीरेंद्र सेहवाग हा मूळचा हरियाणाचा असलेला खेळाडू जो भारताकडून खेळाला. भारताचे कर्णधारपदही त्याने भूषवले आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अत्यंत विरळ असलेला असा दुहेरी शतक झळकावण्याचा विक्रमही त्याने केला आहे. एकदा नव्हे तर दोन वेळा दुहेरी शतक झळकावणारा तो जगातील पहिलाच खेळाडू होता. वीरेंद्र सेहवाग निवृत्त झाल्यावर बऱ्याचवेळा समाज माध्यमांमध्ये करत असलेल्या विविध ट्विट्समुळे चर्चेत असतो.

“छत्रपती शिवरायांना माझं वंदन… जय माँ भवानी” असा नाराही त्याने आजच्या जयंतीदिनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. तसेच शिवरायांचा अश्वारुढ झालेला एक फोटोही सेहवागने ट्विट केला आहे.

Exit mobile version