…म्हणून भारतीय संघाने हातावर बांधली काळी फित

…म्हणून भारतीय संघाने हातावर बांधली काळी फित

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन देशांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगला आहे. या सामन्यासाठी मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने हातावर काळ्या फिती बांधलेल्या दिसत आहेत. संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या डाव्या दंडावर काळी फीत बांधण्यात आली आहे. ही फित बांधण्यामागे एक विशेष कारण आहे.

या काळ्या फितीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाने भारताचे महान क्रीडापटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘फ्लाईंग सिख’ या नावाने ओळखले जाणारे भारताचे जगविख्यात धावपटू मिल्खा सिंग यांचे १८ जून रोजी रात्री निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंग यांचे जाणे साऱ्याच भारतीयांच्या मनाला चटका लावून गेले

हे ही वाचा:

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप: पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारत ६९/२

फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांचा क्वॉरंटाईन

ठाकरे सरकार संविधानिक हक्कांवर गदा आणत गळा घोटण्याचं काम करतंय

शिवसेना आमदाराचा फुकट पेट्रोल भरण्याचा भिकारीपणा

१९ जून रोजी न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने या महान क्रीडापटूला श्रद्धांजली अर्पण करण्याचे ठरवले. त्यासाठी खेळाडूंनी हातावर काळ्या फिती बांधून हा सामना खेळावा असे निश्चित झाले. भारतीय संघ व्यवस्थापनाने यासंदर्भात निर्णय घेतला असून बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंबंधीची माहिती देण्यात आली.

या सामन्याचे पहिले सत्र संपून सध्या दुसरे सत्र सुरु आहे. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे नाबाद खेळत आहेत. या सामन्यातील ३२ षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. तर भारतीय संघाकडून ७० धाव करण्यात आल्या असून २ फलंदाज बाद झाले आहेत.

Exit mobile version