मध्य रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवार, १५ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता दोन एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. दादरहून निघालेल्या पुदुच्चेरी एक्सप्रेसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) निघालेल्या गदग एक्सप्रेसने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पुदुच्चेरी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले. या अपघाताचे कारण आता समोर आले आहे.
गदग एक्सप्रेसच्या लोको पायलट आणि त्याचा सहकाऱ्याने सिग्नल लाल असतानाही तो ओलांडला, नीट पाहिला नाही. त्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे पत्र रेल्वेने जारी केले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन
रशियासमोर आता आणखी दोन ‘युक्रेन’!
गोलमालमधील ‘रत्ना’ काळाच्या पडद्याआड
दादर स्थानकातून बाहेर पडताच पुदुच्चेरी एक्स्प्रेसला गदग एक्स्प्रेस धडकली. त्यामुळे पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे मागील तीन डबे रुळावरुन घसरले. या अपघातात एक डबा बाजूच्या खांबावर कलंडला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातामुळे अप व डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर शनिवार, १६ एप्रिल रोजी या अपघाताचे परिणाम रेल्वे वाहतुकीवर दिसून आले. त्यामुळे लोकल प्रवाशांचेही हाल झाले.