31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेष'आदित्य ठाकरेंच्या पर्यावरणप्रेमाचा हा बोगस चेहरा'

‘आदित्य ठाकरेंच्या पर्यावरणप्रेमाचा हा बोगस चेहरा’

Google News Follow

Related

मुंबईकरांच्या भल्यासाठी होणाऱ्या मेट्रोला आवश्यक असलेले कारशेड आरेमध्ये होऊ नये यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्व तथाकथित पर्यावरणप्रेमींना ठाकरे सरकारकडून या बाबतीतील फार अपेक्षा होत्या. मात्र या बाबतीत त्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. ठाकरे सरकारने आरेमधील आंदोलकांवरील गुन्हे तर मागे घेतले नाहीतच, मात्र आता आरेमध्ये चक्क ‘झोपू’ योजना लागू केली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांचे पर्यावरणप्रेम बोगस असल्याची बोचरी टीका भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड फडणवीस सरकारच्या काळात निश्चीत होते. मात्र स्वार्थी आणि ढोंगी ठाकरे सरकारने पर्यावरणाच्या नावाखाली हे कारशेडला हलविण्याचा घाट घातला. मात्र ठाकरे सरकारचे हे पर्यावरण प्रेम बोगस असल्याचे दिसून आले आहे. आता ठाकरे सरकारने याच आरेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर अतुल भातखळकर यांनी अत्यंत जहाल टीका केली आहे.

हे ही वाचा:

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

जी-२३ पुन्हा आक्रमक?

इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा भडकला

तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा

त्यांनी ट्वीटरवरून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,

आरे कॉलनीत SRA योजना लागू करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मेट्रोकारशेडला विरोध बोगस होता हे स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही उघड झाला आहे. मुंबईकरांचे भले करणारी मेट्रो कारशेड नको, मात्र बिल्डरांचे उखळ पांढरे करून टक्केवारची सोय करणारी SRA योजना मात्र हवी.

त्यामुळे ठाकरे सरकारचे पर्यावरणाशी सुतराम देणे घेण नसून त्यांचा सबंध रस हा केवळ प्रकल्पातून मिळणाऱ्या टक्केवारीकडे असल्याचे ढळढळीतपणे समोर आले आहे.

आरे कॉलनीमध्ये मेट्रोचे कारशेड होणार होते. ही मेट्रो मार्गिका सिप्झ ते कुलाबा अशी आखली आहे. उत्तर दक्षिण जाणारी ही मार्गीका मुंबईकरांसाठी अतिशय सोयीची ठरणार आहे. त्यासाठी मार्गिकेचे कामकाज देखील वेगाने चालू आहे. मात्र कारशेडसाठी आवश्यक असलेली जागा तयार करायला आरे कॉलनीतील सुमारे २००० झाडे तोडावी लागली. त्यावेळी, सध्या पर्यावरणमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे आणि काही सामाजिक संस्थांनी आरे कॉलनी हे जंगल असून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्याचा दावा करत त्या ठिकाणी आंदोलन केले होते. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन ठाकरे सरकार सत्तेवर आले. सत्तेवर येताना ठाकरे सरकार पर्यावरण प्रेमी असल्याचा खोटा बुरखा त्यांनी पांघरला होता. आत्तापर्यंत विविध प्रकल्पांत हा बुरखा अनेकदा फाटला आहे.

नवी मुंबईतील ऐरोली- ठाणे पुलासाठी ०.९८ हेक्टमधील खारफुटींवर कुऱ्हाड चालवली गेली होती. सागरी मार्गासाठी सहाशे झाडांची कत्तल करण्यात आली. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड करता देखील हजारपेक्षा अधिक झाडांची कत्तल करण्यात आली. त्याबरोबरच पालघर, ठाणे आणि रायगड भागात विकसित करण्यात येणाऱ्या मल्टिमोडल कॉरिडॉरसाठी देखील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली होती. त्यामुळे ज्या आरेमधील केवळ २५ हेक्टर जागेवरील झाडांसाठी संपूर्ण मुंबईचं नुकसान या ठाकरे सरकारने केलं, त्यांना आता झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवताना पर्यावरण आड आलं नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा