‘प्ले ऑफ’ मध्ये जागा मिळवणार मुंबईचा संघ? वाचा विजयाचे सूत्र!

‘प्ले ऑफ’ मध्ये जागा मिळवणार मुंबईचा संघ? वाचा विजयाचे सूत्र!

आयपीएल २०२१ च्या साखळी गटातील सामने आता अंतिम टप्प्यात आहेत. आयपीएल २०२१ चे अंतिम चार संघ कोण ठरणार हे आज निश्चित होणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे तीन संघ आयपीएलच्या पुढील फेरीत दाखल झाले आहेत. तर चौथ्या आणि अंतिम जागेसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये चुरस आहे.

कोलकाता संघाने गुरुवार, ७ ऑक्टोबर रोजीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे गुणतालिकेत कोलकाता संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात १४ गुण जमा आहेत. तर मुंबईचा संघ १२ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आज म्हणजेच शुक्रवार, ८ ऑक्टोबर रोजी मुंबई संघाचा सामना सनरायजर्स हैदराबाद संघासोबत होणार आहे. हा सामना जर मुंबई संघ जिंकला तर मुंबईचे गुणही १४ होणार आहेत. म्हणजेच मुंबई आणि कलकत्ता या दोन्ही संघांचे गुण समान होणार आहेत. अशावेळी नेट रन रेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल.

हे ही वाचा:

पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!

मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या

कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत महिला संघाची सुवर्णकमाई!

…आणि असा घातला त्याने मित्रालाच गंडा

मुंबईच्या विजयाचे हे आहे गणित!
नेट रन रेटचा विचार केला तर आयपीएलच्या आठही संघांमध्ये सर्वोत्तम नेट रन रेट हा कोलकाता संघाचा आहे. +०.५८७ इतका कोलकाता संघाचा नेट रन रेट आहे. तर मुंबई संघाचा रन रेट हा -०.०४८ इतका आहे. त्यामुळे मुंबई संघाला जर चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळवायचे असेल तर त्यांना नुसता सामना जिंकून चालणार नाही. तर तो भरपूर मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. मुंबई संघाला हैदराबाद संघाचा १७० पेक्षा अधिक धावांनी पराभव करायला लागणार आहे. तसे झाले तरच मुंबईचा रन रेट हा कोलकाता संघापेक्षा अधिक होईल. त्यामुळे मुंबई संघाला आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्या खेरीज दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईच्या संघाची प्रथम फलंदाजी असेल तर त्यांच्याकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळणार यात शंकाच नाही.

Exit mobile version