भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातून शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील लोकांनी ट्विटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र मोदी आज वयाच्या ७२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. देशभरात पंतप्रधान मोदी अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे देशभरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडूनही पंतप्रधानांच्या वाढदिवशी एक खास मोहीम राबवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत देशविदेशात अनेक दौरे केले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांना अनेक भेटवस्तू आणि मानचिन्हे मिळाली होती. या भेटवस्तूंचा आता ऑनलाईन लिलाव केला जाणार आहे. १७ सप्टेंबरपासून ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून या गोष्टींचा लिलाव होईल. या लिलावातून मिळालेले पैसे नमामि गंगे या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिले जातील.
हे ही वाचा:
फ्रान्सला मागे टाकत भारतीय शेअर बाजार सहाव्या क्रमांकावर
पाकिस्तानमध्ये सामना सुरु होण्यापूर्वी मालिकाच रद्द
अफगाणिस्तानात ‘घटना’ कट्टरतेची जाणीव करून देणारी
विराट कोहलीने केले होते रोहित शर्माला डावलण्याचे प्रयत्न
लिलाव करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये देशातील ऑलिम्पिकपटूंची खेळाची साधने, अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, चारधामची प्रतिकृती, रुद्राक्ष सेंटरची प्रतिकृती, पेटिंग आणि वस्त्रांचा समावेश आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर लिलावसंदर्भातील सर्व तपशील उपलब्ध असेल. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात हा लिलाव पार पडेल.