असा झाला जेईई घोटाळा…

असा झाला जेईई घोटाळा…

जेईई मेन परीक्षेत घोटाळा करणाऱ्या एका टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करत सीबीआयने दिल्ली, एनसीआर, पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर आणि इंदूरसह एकूण १९ ठिकाणी छापे टाकले. एनआयटीसारख्या प्रमुख संस्थांमध्ये नाव नोंदवण्यासाठी ही टोळी १२ ते १५ लाख रुपये घेत होती. सीबीआयने या प्रकरणी १ सप्टेंबरला एफआयआर दाखल केली होती. पण छापे मारण्यासाठी जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा संपण्यासाठी सीबीआय थांबली.

नोएडातील एफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेच्या संचालकांनी जेईई मेन परीक्षेत रँकिंग मिळवून देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा तयार केली होती. त्यांचे एजंट अनेक राज्यांत विखुरलेले होते. हे एजंट जेईई मेन परीक्षेत कमी रँकिंग असलेल्या विद्यार्थ्यांना गाठून त्यांना चांगली रँकिंग आणि एनआयटी सारख्या प्रमुख संस्थेत नाव नोंदणीचं आश्वासन देत होते. याबदल्यात ते १२ ते १५ लाख रुपये मागत होते. परीक्षेत घोटाळा करण्यासाठी एफिनिटी एज्युकेशनच्या संचालकांनी हरयाणातील सोनीपतमधील एका परीक्षा केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना साटंलोटं केलं होतं. विद्यार्थ्यांना हे परीक्षा केंद्र निवडण्यास सांगितलं जात होतं, अशी माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यांमधील अनेक विद्यार्थी जेईई मेनसाठी सोनीपतचे परीक्षा केंद्र निवडत होते. परीक्षा केंद्रातील सामील असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित विद्यार्थ्याच्या कंप्युटरचा रिमोट कंट्रोल घेऊन ते दूर कुठेतरी बसलेल्या एका व्यक्तीला द्यायचे. आणि ती व्यक्ती त्या विद्यार्थ्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत होता.

हे ही वाचा:

अवनी लेखराची पुन्हा एकदा कमाल

वसूलीखोर ठाकरे सरकार उद्योग विरोधी

पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक

ठाकूर तो छा गियो

रँकिंग मिळवून देण्यासाठी एफिनिटी एज्युकेशनचे संचालक विद्यार्थ्यांकडून १२ ते १५ लाखांचा पोस्ट डेटेड चेक घेत होते. तसंच जेईई मेन मध्ये चांगली रँकिंग मिळवून दिल्यावरच चेक वटवला जाईल, याची गँरंटी ते विद्यार्थ्यांना देत होते. सीबीआयच्या छाप्यात ३० पोस्ट डेटेल चेक मिळाले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांची १० वी आणि १२ वीची मूळ प्रमाणपत्रं, जेईई मेनचा युजर आयडी आणि पासवर्ड आपल्याकडे ते आपल्या ठेवून घेत होते. पूर्ण पैसे मिळाल्यावरच ती परत केली जात होती.

Exit mobile version