काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना!

भाजपा आमदार चित्रा वाघ यांच्याकडून अमित देशमुखांचा व्हिडीओ पोस्टकरत टीका

काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना!

भाजपा महिला नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस उमेदवाराचा व्हिडीओ पोस्त करत काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते भाजपच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा आर्ची असा उल्लेख केल्याचे दिसत आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीटकरत म्हटले, लाडकी बहिणविरोधात याचिका, माल, बकरीसारखे शब्द वापरल्यावर काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना आहे. काँग्रेसचे लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांनी भाजपच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले आहेत. हेच आहे का काँग्रेसचं महिलांविषयी धोरणं? महिलांचा सन्मान करता येत नसेल तर अपमान करू नका..?, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, तुमच्या अहंकारी आणि मग्रुरीच्या भाषेला जनता मतदानातून नक्की प्रत्युत्तर देईल. महिलाओं के अवमान में काँग्रेस मैदान में. महिलाओं के अवमान में महाविकास आघाडी मैदान मैं, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान, अमित देशमुख यांचा प्रचाररॅली मधील हा व्हिडीओ आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘नाही आर्ची, नाही परश्या’ लातूरमध्ये फक्त अमित विलासराव देशमुख यांची चर्चा.

हे ही वाचा : 

क्षितीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर यांच्याकडून आधी आरोप आणि नंतर तावडेंच्या गाडीचे सारथ्य

मूल्य आणि तत्त्वे कमी झाल्यामुळेच ‘आप’ला सोडचिठ्ठी!

अनिल देशमुखांच्या गाडीवरील हल्ला म्हणजे सहानुभुती मिळवण्यासाठीचा प्रयत्न

मतदानाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त, मुंबईत ३० हजार पोलिस तैनात!

Exit mobile version