भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालमधील संदेशखालीच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. जर ममता बॅनर्जींना वाटत असेल की त्या जनतेला घाबरवून निवडणुका जिंकता येतील तर ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे, असे जेपी नड्डा म्हणाले.
तृणमूल काँग्रेस अध्यक्षांवर हल्लाबोल करताना नड्डा म्हणाले की, “ममता बॅनर्जींच्या राजवटीत शेख शाहजहानसारखे लोक महिलांसाठी धोकादायक बनले होते.तिथे गेलेल्या तपास यंत्रणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले.संदेशखालीत जनतेच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडोना उतरावे लागले.”काय ममता जी जनतेला धमकवून, त्यांचा जीव घेऊन निवडणुका जिंकतील?, असे जर ममता बॅनर्जी यांना वाटत असेल तर त्यांची ही सर्वात मोठी चूक असेल, असे नड्डा म्हणाले.
हे ही वाचा:
सीबीआयच्या संदेशखालीतील छापेमारीवरून बंगालमध्ये नवीन राजकीय वाद!
ग्वाल्हेरमध्ये लव्ह जिहाद: विवाहित साबीरकडून हिंदू मुलीचे अपहरण!
ज्यू अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा अमेरिकेतील पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनाशी संबंध!
जेपी नड्डा पुढे म्हणाले की, ज्या बंगालमध्ये शास्त्रीय गाणी ऐकायला हवी होती, त्या ठिकाणी बॉम्ब आणि पिस्तूल सापडत आहेत.ममताजी आपण बंगालला काय बनवून ठेवले आहे?.जनता तुम्हाला चोख प्रत्युत्तर देईल आणि भाजप या ठिकाणी ३५ जागांवर विजय मिळवेल.संदेशखालीच्या पिडीत महिलेला तिकिट देऊन भाजपने दाखवून दिले आहे की संदेशखालीच्या या महिला एकट्या नाहीत, असे नड्डा म्हणाले.याशिवाय भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी ममता सरकार टीका केली आणि दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप केला.