आता ‘हा’ भारतीय खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

आता ‘हा’ भारतीय खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

भारतीय क्रिकेट संघात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. यावेळी हा शिरकाव इंग्लंडमध्ये नाही तर श्रीलंकेत झाला आहे. नुकताच इंग्लंडमध्ये असणाऱ्या संघातील ऋषभ पंत कोरोनातून सावरला असताना आणखी एका आघाडीच्या भारतीय खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे. हा भारतीय खेळाडू म्हणजे अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या असून तो सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. नुकतीच त्याने एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली. त्यानंतर रविवारी झालेल्या पहिल्या टी-२० मालिकेतही कृणाल संघामध्ये होता. सुरुवातीपासून संघात असणाऱ्या कृणालला कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण संघावर कोरोनाचे सावट आले आहे.

या संकटामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील आज होणारा दुसरा टी-२० सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे. नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबद्दल माहिती देत ट्विट देखील केलं आहे. आतापर्यंत केवळ कृणालाच कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली असली तरी सर्व खेळाडूंना त्वरीत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंका संघावर ३८ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आज (२७ जुलै) दुसरा सामना खेळवला जाणार होता. पण भारतीय संघातून सुरुवातीपासून खेळणाऱ्या कृणालला कोरोनाची बाधा झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जर सर्व खेळाडूंच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या तर सामना उद्या म्हणजेच २८ जुलैला खेळवला जाऊ शकतो.

हे ही वाचा:

कोकणासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे

एवढा ‘ज्यू द्वेष’ की ऑलिम्पिकचंही महत्व नाही

रिलायन्सच्या नावाने ‘हा’ नवा विक्रम

राज्यपाल कोश्यारी आज पूरग्रस्तांना भेटणार

आता यामुळे पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांचीही कोविड चाचणी होणार आहे. जर या चाचणीत तेही पॉझिटिव्ह आढळले, तर त्यांचा इंग्लंड दौरा रद्द होऊ शकतो.

Exit mobile version