बांगलादेशात हिंसाचार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. लष्कराने सत्ता घेतली असली तरी अजूनही बांगलादेश हिंसाचारात धगधगत आहे. निष्पाप लोकांच्या घरावर हल्ला करत घरातील दागिने चोरत त्यांची हत्या केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. आता तर संतप्त जमावाने प्रसिद्ध अभिनेता आणि त्याच्या वडिलांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. अभिनेता शांतो खान आणि त्यांचे वडील सलीम खान यांना जमावाने मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली आहे.
शांतो खान हे बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. तर सलीम खान चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होते. तसेच ते चंदपूर सदर उपजिल्हाच्या लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे अध्यक्ष होते. सोमवारी (५ ऑगस्ट) दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. बंगाली सिनेमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची पुष्टी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शांतो खान आणि त्याचे वडील सलीम सोमवारी दुपारी घरातून निघाले असताना फरक्काबाद मार्केटमध्ये गोंधळ झाला. त्यानंतर त्यांचा सामना जमावाशी झाला. त्यावेळी त्यांनी बचाव करण्यासाठी स्वतःकडे असलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने गोळीबार करून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, काही वेळानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे यामध्ये मरण पावलेले सलीम खान हे मुजीबूर रहमान यांच्यावरील चित्रपटाचे निर्माते होते.
हे ही वाचा..
बांगलादेशात आंदोलकांकडून अवामी लीग पार्टीच्या २० नेत्यांची हत्या
डॉ. दातार यांना यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
ट्रम्प यांच्या हत्येच्या कटामागे इराणशी संबंधित पाकिस्तानी व्यक्ती?
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस कोण आहेत?
दरम्यान, सलीम खान आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल होता. चांदपूर सागरी सीमेवरील पद्मा-मेघना नदीत अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी सलीम खान याना दोषी ठरवण्यात आले होते. यासाठी ते तुरुंगातही गेले होते. सध्या त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक आयोगातही खटला सुरू होता.