28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषमहाराष्ट्रातील 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त

Google News Follow

Related

राज्यात कोविडची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या दरम्यानच महाराष्ट्रातील एक जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे.

राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.

भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. भंडाऱ्यात गेल्या वर्षी २७ एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, अशी माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी ५७८ जणांचे सँपल तपासण्यात आले. त्यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं आढळून आलं आहे.

हे ही वाचा:

लाल चौकाची तिरंगी सजावट

…म्हणून तेजस ठाकरेंची व्हिव्हियन रिचर्ड्स सोबत तुलना! नार्वेकरांचा खुलासा

भारताच्या लस उत्पादनात वाढ

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस

या वर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वाधिक १५९६ रुग्ण आढळले होते. तर  एप्रिल रोजी जिल्ह्यात १२,८४७ रुग्ण सक्रिय होते. तर १२ जुलै २०२० रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला होता. तर यावर्षी १ मे रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ३५ झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात ११३३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी कदम यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहेत. त्यानुसार, १८ एप्रिल रोजी जिल्ह्यात १२,८४७ सक्रिय रुग्ण होते. मात्र, त्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली. २२ एप्रिल रोजी सर्वाधिक १५६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. १९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील रिकव्हरी रेट घटून ६२.५८ टक्के होता. आता हा रिकव्हरी रेट वाढून ९८.११ टक्के एवढा झाला आहे. तर १२ एप्रिल रोजी पॉझिटीव्हिटी रेट सर्वाधिक ५५.७३ टक्के होता. तो आता घटून शून्य झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर १.८९ टक्के असल्याचंही कदम यांनी सांगितलं केलं.

जिल्ह्यात आतापर्यंत ४,४९,८३२ कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ५९,८०९ सँपल पॉझिटिव्ह आढळले होते. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५८,७७६ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्याच्या ९.५ लाख लोकसंख्येच्या ४० टक्के लोकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर १५ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा