मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे वाहनप्रवास होणार अधिक सुरक्षित

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे वाहनप्रवास होणार अधिक सुरक्षित

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्राकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आले असून चारचाकी वाहनांमध्ये आता सहा एअरबॅग्स बसवा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना दिले आहेत. दरम्यान हा निर्णय नक्की का घेण्यात आला असावा? सहा एअरबॅग्स बसवणं उत्पादकांना कितपत शक्य आहे? यावरच एक नजर टाकूया.

भारताची लोकसंख्या जसजशी दिवसाला वाढते आहे, तसतशी रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्याही पुढे जाते आहे. अनेक मेट्रो शहरांमध्ये तर या वाहनांचं प्रमाण एवढं वाढलंय की शहरवासियांना तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातांच्या घटनाही रोज कानी पडत असून सगळ्यांसाठीच हा चिंतेचा विषय बनलाय. याच पार्श्वभूमीवर भारतीय वाहन उत्पादक सोसायटीच्या कार्यकारी प्रमुखांच्या प्रतिनिधींची केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेत त्यांना एक महत्वाची सूचना केली.

नितीन गडकरी यांनी ३ ऑगस्टला वाहन उत्पादकांची भेट घेत अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली विशेष म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चारचाकी वाहनांच्या सर्व श्रेणी आणि प्रकारांमध्ये आता किमान सहा एअरबॅग्स असाव्यात असे त्यांना निर्देश दिले.

हे ही वाचा:

‘या’ दिवशी राम मंदिर भाविकांसाठी उघडणार

जेंव्हा मोदी विरोधकांची आपसातच जुंपते….

पूरग्रस्तांना ११,५०० नाही, तर केवळ १५०० कोटींची तातडीची मदत

खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार

ऑटोमोबाईल एक्सपर्ट संदीप काळे यांनी म्हटलं की, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा चांगलाच निर्णय आहे. टॉप एन्ड मॉडेलमध्ये जवळपास ६ एअरबॅग्स असतातच. मात्र आता बेसिकमध्येही द्याव्या लागतील. डॅशबोर्ड आणि इतर गोष्टींमध्ये बदल करावा लागेल, मात्र यामुळे वाहनाची १० ते १२ टक्क्यांनी किंमत वाढेल.

Exit mobile version