भाजपाच्या ‘या’ खासदाराची आत्महत्या?

भाजपाच्या ‘या’ खासदाराची आत्महत्या?

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातली भाजपाचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयाशेजारीच शर्मा यांचा फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये आज सकाळी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून समजू शकलं नसून त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

खासदार रामस्वरुप शर्मा हे हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार संघातून दोन वेळा निवडून आले होते. हिमाचल प्रदेशमध्ये २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला सर्वच्या जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे मोदी लाट असताना दोन्ही वेळेला राम स्वरूप शर्मा हे निवडून आले होते.

हे ही वाचा:

इंग्लंडने उडवला भारताचा धुव्वा…८ विकेट राखून विजय

सचिन वाझेंनी नष्ट केला इमारतीतील डीव्हीआर

पवारांच्या पत्रकार परिषदेत नव्हता जोर, ओरडले फक्त मोर

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८:३० वाजता त्यांना गोमती अपार्टमेंटमध्ये खासदार रामस्वरुप शर्मा यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून ते अधिक तपास करत आहेत. दरम्यान, शर्मा यांच्या मृत्यूमुळे भाजपच्या संसदीय दलाची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.

Exit mobile version