29 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरविशेष... म्हणून या खेळाडूने चक्क ऑलिम्पिक पदक काढले लिलावात

… म्हणून या खेळाडूने चक्क ऑलिम्पिक पदक काढले लिलावात

Google News Follow

Related

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पोलंडच्या मारिया आंद्रेझिक हिने भालाफेकमध्ये रौप्य पदक मिळवले. पण दोन आठवड्यातच तिने या पदकाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला.

मिलॉसझेक मलिसा या आठ महिन्याच्या मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया होणार आहे. या मुलाच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्यासाठी मारियाने पदक लिलावात काढण्याचा निर्णय घेतला. ११ ऑगस्टला मारियाने फेसबुकच्या माध्यमातून याची माहिती दिली.

मिलॉसझेक मलिसा याला हृदयाचा गंभीर आजार असून युरोपातील जवळजवळ सर्वच रुग्णालयांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणे गरजेचे आहे त्यामुळे अखेरची आस म्हणून या मुलाच्या कुटुंबाने त्याला अमेरिकेतील स्टँडफर्ड विद्यापीठातील वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी नेण्याचे ठरवले आहे. या शस्त्रक्रियेसाठी खूप खर्च असल्याचे मारियाला समजले आणि तिने पदक लिलावासह ऑनलाईन आर्थिक मदतीचे आवा हनही केले आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानवर कब्जा करूनही तालिबान कंगाल

तालिबानचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे

शिवसैनिकांनी केली ‘या’ नेत्यावर दगडफेक

अफगाण फुटबॉलपटूचा ‘असा’ झाला मृत्यू

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मारियाचे पदक थोडक्यात हुकले होते. २०१९ मध्ये मारियाला हाडांचा सौम्य ट्युमर झाला होता. ट्युमरच्या उपचारासाठी मारियाची शस्त्रक्रियाही करावी लागली होती. या उपचारांचे दिव्य पार पाडून मारियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक कमावले. तिच्या कारकीर्दीतले हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे. मारियाच्या या पदकावर झाब्का या कंपनीने मोठी बोली लावली आणि हे पदक मारियाकडेच ठेवण्याचा मनाचा मोठेपणाही दाखवला. गरजेच्या ९० टक्के रक्कम जमा झाली असून उरलेली १० टक्के रक्कमही लवकरच जमा होईल, अशी मारिया आणि मिलॉसझेकच्या कुटुंबियांना खात्री आहे.

पदक ही एक वस्तू आहे. पदकाचे महत्त्व हे तुमच्या हृद्यात टिकून रहायला हवे. माझे रौप्यपदक एका लहान मुलाचे प्राण वाचवण्यासाठी कामाला आले आणि त्यामुळेच माझ्या ऑलिम्पिकच्या पदकाची चमक अजून वाढली. अन्यथा ते एक शोभेची वस्तु म्हणून धूळ खात पडले असते, असे मारिया आंद्रेझिकने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा