26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषतब्बल सात तास गळ्यापर्यंत मातीत अडकले, बाकी कुणीच वाचले नाही...किल्लारी भूकंपाच्या विदारक...

तब्बल सात तास गळ्यापर्यंत मातीत अडकले, बाकी कुणीच वाचले नाही…किल्लारी भूकंपाच्या विदारक आठवणी

किल्लारीतील भूकंपाला झाली ३० वर्षे

Google News Follow

Related

३० सप्टेंबर, १९९३. सुमारे ३० वर्षांपूर्वी आलेल्या भयकारी भूकंपामुळे लातूर आणि उस्मानाबादमधील सुमारे ५२ गावे हादरली होती. या महाभयंकर भूकंपाच्या आठवणी अजूनही त्यांच्या आठवणींतून पुसल्या गेलेल्या नाहीत. अवघे ४७ सेकंद जाणवलेला हा धक्का त्यांना अजूनही विसरता आलेला नाही.

 

६० वर्षीय आप्पाराव कुराळे त्या धक्क्यातून अजूनही सावरू शकलेले नाहीत. त्यांची पत्नी, चार मुले, आई-वडील, भाऊ हे किल्लारीतील त्यांच्या गावातील घरात अडकून पडले होते. ३० सप्टेंबरच्या रात्री तब्बल ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. वेळ हे कोणत्याही जखमेवर सर्वोत्तम उपाय असल्याचे सांगितले जाते. मात्र काही जखमा खूप खोल असतात. कुराळे हेही त्या जखमांतून अद्याप सावरलेले नाहीत. जेव्हा भूकंपाचा धक्का बसला, तेव्हा त्यांचे मातीचे घर कोसळू लागले.

 

 

‘मी गळ्यापर्यंत मातीमध्ये अडकलो होतो. तब्बल सात तास मी तसाच अडकलो होतो. त्यानंतर माझी सुटका झाली. मात्र बाकी कोणीच वाचू शकलं नाही. तिथपासून मला एकच प्रश्न सतावतो. मीच का जिवंत राहिलो? माझ्या पाठीच्या कण्याला मार बसल्याने मी कधीही काम करू शकणार नाही. कोणतीही नुकसानभरपाई माझ्या जखमा भरू शकणार नाही,’ राज्य सरकारने बांधून दिलेल्या घराबाहेरील खाटेवर बसलेले आप्पाराव सांगतात. हे नवीन किल्लारी गाव त्यांच्या मूळ गावापासून पाच किमी अंतरावर वसवले आहे.

 

भूकंपानंतर अनेक दिवस परिसरात पाऊस पडत होता. त्यामुळे बचावमोहिमेला अडथळे आले. राज्य सरकार आणि देशभरातील अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला. खाद्यपदार्थ आणि निवासव्यवस्था, कपड्यांची मदत केली जात होती. सर्वांत मुख्य आव्हान होते ते पावसापासून ग्रामस्थांचे रक्षण करणे आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखणे. सुरुवातीला या दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांना सुरुवातीला गोठा आणि शेतातील बांबूच्या तात्पुरत्या घरांमध्ये आश्रय दिला गेल्या. त्यानंतर त्यांच्यासाठी पत्र्याची घरे बांधली गेली. त्यानंतर तीन वर्षांमध्ये सरकारने त्यांच्यासाठी भूकंपरोधक काँक्रीटची घरे बांधली. ही घरे नंतर भुज आणि अन्य भूकंपाच्या ठिकाणांवरील बचावग्रस्तांसाठी मार्गदर्शक ठरली.

हे ही वाचा:

न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप

दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे ‘मैदानात’

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द

‘इतरांकडून भाषण स्वातंत्र्य शिकण्याची गरज नाही’

 

कुराळे त्यांच्या डोक्यावरील पत्र्याच्या छताकडे बोट दाखवतात. त्यांना हेच पत्र्याचे घर पहिल्यांदा मिळाले होते. ‘मी आता काँक्रीटच्या घरात राहू शकत नाही. या पत्र्याच्या घरालाच मी घर मानतो,’ असे ते सांगतात. भूकंपामुळे या गावांतील माती आणि दगडांची घरे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. सरकारी आकडेवारीनुसार, या भूकंपात सुमारे १० हजार जण मृत्युमुखी पडले होते तर हजारो जण जखमी झाले होते.

 

 

आम्ही तेव्हाही विटांचेच घर बांधले असते तर… असे किल्लारीचेच रहिवासी शरद भोसले सांगतात. भूकंपाबाबत त्यांना कळले तेव्हा ते किल्लारी गावापासून ४० किमी दूर असलेल्या लातूर शहरात राहात होते. ते तातडीने मित्राच्या बाइकवरून किल्लारीला पोहोचले. ‘मी अक्षरश: हादरलो होतो. संपूर्ण गाव दु:खात बुडाले होते. मी माझ्या कुटुंबातील नऊ जणांना गमावले. माझे वडील, काका, काकी आणि चुलतभावंडांचा यात मृत्यू झाला. माझी आई, बहीण आणि तिची मुले बचावली,’ शरद भोसले सांगतात.

 

 

भोसले हे किल्लारीत सुपरमार्केट चालवतात. भोसलेंचे कुटुंबीय किल्लारीच्या सुप्रसिद्ध धान्य मार्केटच्या व्यापारातील अग्रगण्य व्यापारी होते. ‘मला माझी स्वप्न रात्रीच्या रात्री सोडून द्यावी लागली आणि घर चालवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर घ्यावी लागली. मी माझे शिक्षण सोडले आणि पुन्हा धान्य व्यापाराचा व्यवसाय सुरू केला. मात्र बाजाराला त्याचे पूर्वीसारखे वैभव परत मिळाले नाही,” असे ते सांगतात. ‘आपल्या आयुष्यात काहीही घडू शकते, त्याला तोंड देण्यासाठी आपण प्रत्येकाने तयार राहिले पाहिजे. आपण सरकार आणि सरकारी यंत्रणांकडून सतत अपेक्षा करता कामा नये. आपण स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे,’ असे ते सांगतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा