देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची आकडेवारी काहीशी कमी होताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेपासून सावध राहण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय सरकारकडून आखले जातायेत. अशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन भारतात तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो, असा इशाराही अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सिंगापूरची हवाई वाहतूक तात्काळ थांबवण्याचं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केलं आहे. तसेच लहान मुलांना लस उपलब्ध होण्याच्या पर्यायांवर प्राथमिकतेच्या आधारावर काम होणे गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं.
गेल्या काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत वेगाने वाढ होते आहे. या पार्श्वभूमीवर १४ मे रोजी सिंगापूरमध्ये लोकांना एकत्र येणे आणि तसेच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने इतर गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश
२३ मे रोजी सर्व ऑनलाईन व्यवहार बंद?
स्पुतनिक-व्ही लस मुंबईत कधी? कुठे? किंमत काय?
कोरोनाविषयी जागृती निर्माण करणारे, पद्मश्री डॉ. के. के. अगरवाल यांचे निधन
सिंगापूरचे शिक्षणमंत्री लॉरेन्स वोंग यांनी म्हटलं की, जर आपण किराणा सामान विकत घेण्यासाठी, व्यायामासाठी किंवा इतर काही कामासाठी बाहेर गेलात तर जास्तीत जास्त दोन लोकांना एकत्र येण्याची परवानगी असेल. आतापर्यंत देशात ६१ हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३१ जणांना मृत्यू झाला आहे.