संपूर्ण आशियामध्ये कोरोना विषाणू संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. थायलंड आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये, जिथे पूर्वी कोरोनाची फारच कमी प्रकरणे होती, हा रोग वेगाने पसरू लागला आहे. भारतातही कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. दररोज ४० हजारांहून अधिक प्रकरणे येत आहेत. ऑलिम्पिक खेळ टोकियोमध्ये आयोजित केला जात आहे. परंतु. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गामुळे कहर झाला आहे. व्हिएतनामसारख्या देशांमध्ये, जिथे पूर्वी कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर नियंत्रित केला गेला होता, तिथे कोरोनाची प्रकरणेही झपाट्याने वाढत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता, आशियातील अनेक देशांनी आपापल्या शहरात निर्बंध लादले आहेत. आशियातील कोणत्या देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊया.
कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपासून सुरू झाला. परंतु, जगात पसरल्यानंतर चीनने आपल्या देशात या आजारावर वेगाने नियंत्रण केले. पण आता पुन्हा तिथे परिस्थिती बिकट होत आहे. डेल्टा व्हेरिएंट यासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. डेल्टा प्रकारांची जास्तीत जास्त प्रकरणे नानजियांग शहरात आढळून येत आहेत.
हे ही वाचा:
गणपती बाप्पा मोरया, ‘या’ गणपतीचं दर्शन घ्या
नरेंद्र मोदी करणार ‘हे’ ऐतिहासिक काम
महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती संदर्भात मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले पत्र
जपानमध्ये दररोज सुमारे १२ हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. जपानने ऑलिम्पिक खेळांच्या दृष्टीने बाहेरील लोकांसाठी कडक निर्बंध लादले आहेत. जपानच्या ऑलिम्पिक संघटनेचे म्हणणे आहे की खेळांशी संबंधित व्यक्ती आणि पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींवर बंदी घालण्यात आली आहे. जपानी अधिकाऱ्यांनी सांगितले की गेम व्हिलेजजवळ कोणालाही परवानगी नव्हती. कोरोना महामारी काळाता सुरक्षित ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जॉर्जियाच्या रौप्य पदक विजेत्यासह सहा लोकांना जपानमधून हद्दपार करण्यात आले आहे.