25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषमहाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट?

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट?

Google News Follow

Related

देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट कमी होत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट मोठी झाली आहे. मात्र आता महाराष्ट्रात तिसरी लाट आली का काय? असा प्रश्न पडला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून मग ती पहिली कोरोनाची लाट असो वा दुसरी. सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पाहायला मिळाला. अचानक आलेल्या कोरोना संकटामध्ये झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या, वाढता मृतांचा आकडा, ऑक्सिजनसह बेडची कमतरता यासारख्या आरोग्य यंत्रणांतील त्रुटींचाही सामना महाराष्ट्राला करावा लागला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या एकूण आकड्यापैकी सर्वाधिक आकडाही महाराष्ट्राचाच आहे.

कोरोनाच्या संकटात अशी शंका व्यक्त केली जात आहे की, सध्या ज्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. ती कधीही येऊ शकते. तज्ज्ञांच्या निकषांनुसार, ही कोरोनाची तिसरी लाट कोरोनाच्या आधीच्या दोन लाटांपेक्षा अधिक भयावह असणार आहे. तसेच या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असणार आहे. अनेक लहान मुलं या लाटेची शिकार होऊ शकतात. दरम्यान, ही तिसरी लाट केव्हा आणि कधी येणार, यासंदर्भात कोणतेही स्पष्ट दावे करण्यात आलेले नाहीत.

महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. पण अशातच आणखी एक धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात ज्या लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली होती, त्याची आकडेवारी समोर आली आहे. जी अत्यंत धक्कादायक आहेत. महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, केवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात जवळपास आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्र सरकारनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. सांगली शहरातील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्पेशल कोरोना वॉर्डही तयार करण्यात आला आहे. येथे सध्या पाच मुलांना कोरोनाची लागण झाली असून ते या स्पेशल वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.

हे ही वाचा:

मेट्रो २अ, मेट्रो ७ ची चाचणी आज

दहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नव्या थापा, नव्या बाता

बारावीच्या परीक्षांबाबत केंद्राकडे बोट

महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला माहीत नाही की, तिसरी लाट केव्हा येईल आणि ती किती धोकादायक असेल. पण आम्ही त्यासाठी तयारी सुरु केली आहे. आम्ही लहान मुलांसाठी स्पेशल कोविड वॉर्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे. तिथे लहान मुलांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचाही आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही या स्पेशल कोविड वॉर्डमध्ये शाळा किंवा प्री-नर्सरी शाळांप्रमाणे वातावरण तयार करणार आहोत. जिथे मुलं आनंदी राहू शकतील आणि उपचार घेऊ शकतील.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा