केरळ, महाराष्ट्रात तिसरी लाट आली?

केरळ, महाराष्ट्रात तिसरी लाट आली?

गेल्या आठवड्याभरापासून देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढतोय. महाराष्ट्रातही कोरोनाच्या केसेसमध्ये अचानक वाढ होताना दिसतेय. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात पीआयबीच्या माहितीनुसार ६ हजार ६०० नव्या रुग्णांची भर पडलीय तर देशात हा आकडा ४१ हजार ४९ एवढा आहे. त्यातही ४१ हजार रुग्णांपैकी एकट्या केरळच्या रुग्णांची संख्या ही निम्म्यावर आहे.

केरळ सरकारच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात तिथं कोरोनाच्या २० हजार ७७२ नवे रुग्ण आढळून आलेत. तर ११६ रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात ज्या नव्या केसेस सापडतायत त्यात एकट्या केरळचा वाटा हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केरळमध्ये १३.६१ एवढा संक्रमनाचा दर आहे. बकरी ईदला केरळ सरकारनं मोठी सुट दिली आणि त्याचाच परिणाम म्हणून कोरोनाचा स्फोट झाल्याचा आरोपही केला जातोय. पण कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता, तिथल्या सरकारनं शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केलीय. बारामती, लातूर, बीड अशा ठिकाणी कोरोनाचा प्रार्दुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढतानाच दिसतोय.

हे ही वाचा:

कमलप्रीतची कमाल जीत, अंतिम फेरी निश्चित!

आसाम, मिझोराम संघर्षाला ‘हे’ नवं वळण

‘कटारिया’ काळजात घुसली

बेन स्टोक्सचा क्रिकेटला अलविदा?

विशेष म्हणजे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात साडे सहा हजारापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काही रिपोर्टनुसार तर हा आकडा येत्या एक दोन दिवसात १० हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय. शेवटच्या हाती आलेल्या माहितीनुसार ७ हजार ४३१ रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेत. तर २३१ जणांना मात्र जीव गमवावा लागलाय. सध्यस्थितीत महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांचा आकडा हा ७७ हजार ४९४ एवढा आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे १ लाख ३२ हजार ५६६ रुग्णांचा बळी गेलाय.

Exit mobile version