‘चिंतामणी’च्या मिरवणुकीत चोरट्यांचा जल्लोष

तब्बल ८९ हून अधिक मोबाईल चोरट्यांनी लंपास केले

‘चिंतामणी’च्या मिरवणुकीत चोरट्यांचा जल्लोष

मुंबईतील प्रसिद्ध चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यास गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोबाइल आणि पाकिटांवर डल्ला मारला. चोरांनी भाविकांचे मोबाइल आणि खिसे साफ केले आहेत. आगमन सोहळ्यातील तुडुंब गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी जल्लोष केला आहे. तब्बल ८९ हून अधिक मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत.

चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात मोबाइल चोरट्यांनी मोबाइल चोरी करण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे हा आकडा चढा असल्याचे दिसत आहे. चिंतामणी आगमन सोहळ्यात होणारी भाविकांची गर्दी आणि त्या गर्दीचा फायदा घेणारी टोळक्यांचा सुळसुळाट पाहावयास मिळतो. सणांच्या काळात काही टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा !

जम्मू काश्मीरमध्ये प्राणार्पण केलेल्या हरमिंदर यांचा मुलगा झाला लेफ्टनंट

राजस्थानमध्ये बलात्कारित महिला तासनतास होती रस्त्यावर !

आर्थिक समावेशनाचे ४७ वर्षांचे लक्ष्य ६ वर्षांत पूर्ण

चिंतामणीच्या २०१९ च्या आगमन सोहळ्यात पन्नासहून अधिक मोबाइल चोरीला गेले होते. त्यानंतर कोरोना काळात आगमन सोहळ्यावर बंदी होती. त्यानंतर सणांवरील बंदी उठवल्यानंतर २०२२ मध्ये मोबाइल चोरांनी मागील वर्षाची तूट भरून काढल्याचे चित्र दिसते. त्यांनी तब्बल ७२ हून अधिक मोबाइलवर डल्ला मारला. तर यावर्षी चोरट्यांनी तब्बल ८९ हून अधिक मोबाइल लंपास केलेले आहेत. यावरून हा आकडा आता वाढता वाढता वाढे असाच झालेला दिसत आहे.

प्रचंड गर्दी असल्याने बाप्पाच्या आगमन सोहळ्यानंतर काहींना आपले मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आले. अलोट गर्दी असल्याने मोबाइल कोणी चोरले याचा अंदाजही बांधता येत नव्हता. काहींचे महागडे फोन चोरीला गेले असल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version