27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषभारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!

भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!

मायदेशी परतण्यासाठी इच्छुक

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत गाझा सीमेजवळील दहशदवादी आणि नागरिकांसह तीन हजार हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.युद्धामुळे दोन्ही देशात चाललेला रक्तपात आणि हिंसासाचाराचा परिणाम इस्रायलमध्येच नाहीतर भारतात राहणाऱ्या इस्रायल नागरिकांच्या नातेवाईकांवरही झाला आहे.

इस्रायलमध्ये मृत्यूची संख्या दररोज वाढत असल्याने, भारतात राहणारे इस्रायल नागरिक घाबरले आहेत.हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे भारतातील इस्रायलने त्यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. इस्रायल नागरिक काही कारणास्तव भारतात येऊन काही काळ भारतात थांबले आहेत, यातील काही पर्यटक असून शक्य होतील तितक्या लवकर त्यांना आपल्या मायदेशी परत जायचे आहे.

हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केल्याने भारतातील हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात राहणाऱ्या केनेरियातील एका इस्रायली महिलेने हमासचा निषेध केला.ती म्हणाली, हमासने हल्ला केल्यानंतर मी माझ्या कुटुंबांशी संपर्क केला तेव्हा मला कळले की माझ्या घरावरही बॉम्बस्फोट झाला.माझा भाऊ इस्रायली सैन्यात कार्यरत असून मी त्याच्या संपर्कात आहे, ती पुढे म्हणाली.”माझी मावशी दक्षिण इस्रायलमध्ये राहते. हमासच्या हल्ल्यात तिच्या घरावर बॉम्बस्फोट झाला. मी माझ्या भावाशी बोलत आहे पण मला भीती वाटते. माझ्या चुलत भावाला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे, ती पुढे म्हणाली.इस्त्रायलला परत जायचे आहे परंतु मला भारतात सुरक्षित वाटत असल्याचे तिने सांगितले.मला माझ्या कुटुंबांची काळजी आहे पण मी इथे अधिक सुरक्षित आहे.तसेच मला माझ्या देशात परत जाण्याची मला भीती मला कधीच वाटली नसल्याचे तिने सांगितले.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या तोंडी दिले जाणार होते!

ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल!

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतिफची पाकिस्तानात हत्या

शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या चकमकीची नोंद सापडली

कुल्लू येथे राहणारी एक इस्रायली पर्यटक म्हणाली, हमासच्या दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला आमचे सैनिक प्रत्युत्तर देत लढत आहेत आणि मला तिकडे जाऊन त्यांना मदत करण्याची इच्छा आहे.
हमास आणि इस्रायल मधील संघर्ष हा जुनाच आहे परंतु सध्या सुरू असलेले युद्ध हे भयानक आणि क्रूर आहे, ज्याची मला अपेक्षाही नव्हती. भारताकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे.तसेच इतर देशांनी देखील इस्रायलमधील परिस्थिती समजून घेण्याचे मी आवाहन करते, ती पुढे म्हणाली.राजस्थानच्या पुष्करमधील इस्रायली पर्यटक अमतने आपल्या देशात परत जाण्याची आणि इस्रायली संरक्षण दलांसोबत युद्धभूमीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली.हमासने महिला, मुले आणि सैनिकांवर केलेल्या हल्ल्यामुळे मी सुद्धा शत्रूशी दोन हात करण्यास माझा मानस असल्याचे त्याने सांगितले.अमत हा १५ ऑक्टोबरला इस्रायलला परतणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा