युजवेंद्र चहलच्या निवडीवरून हरभजन सिंगने बीसीसीआयला सुनावले!

टी - २० मधून वगळल्यानंतर व्यक्त केल्या भावना

युजवेंद्र चहलच्या निवडीवरून हरभजन सिंगने बीसीसीआयला सुनावले!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी गुरुवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.या मालिकेसाठी अनेक खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे तर अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.फिरकीपटू युजवेंद्र चहल बराच काळ संघाबाहेर होता त्याला आता भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे.चहल जानेवारीत भारताकडून एकदिवसीय सामना खेळाला होता.युजवेंद्र चहलच्या निवडीबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपली प्रतिक्रिया दिली आहे.हरभजन सिंगने निवडकर्त्यांवर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा:

अजित पवार निर्मित ‘बिनपैशाचा तमाशा’ सिझन-२

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला सात महिने ठेवले ओलीस!

मुंबईत ‘रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनचे आयोजन!

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने अमेरिकेत रचला इतिहास!

युजवेंद्र चहलला आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही.त्यावरून हरभजन सिंगने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या टी- २० मालिकेतही चहलला स्थान मिळाले नाही.तब्बल वर्षभरानंतर चहलाला वनडे संघात स्थान मिळाले.हरभजन सिंग त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, युजवेंद्र चहल टी-२० फॉरमॅटमध्ये नाही.तुम्ही त्याला वनडेत ठेवले पण टी -२० मध्ये नाही. त्यांनी फक्त त्याला चोखण्यासाठी लॉलीपॉप दिला आहे. ज्या फॉर्मेटमध्ये त्याची कामगिरी जबरदस्त आहे त्यात तुम्ही त्याला स्थान दिलं नाही. हे खरंच समजण्यापलीकडचं आहे, असे हरभजन म्हणाला.गेल्या काही महिन्यात जेव्हा-जेव्हा चहलचे नाव संघातून वगळले गेले तेव्हा हरभजन सिंगने त्याच्या निवडीवरून काही कविता देऊन प्रतिक्रिया दिल्या .

दरम्यान,वनडे वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्यानंतर युजवेंद्र चहल सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीत खेळला होता. या स्पर्धेत तो हरयाणा संघाकडून खेळाला. या दहा सामन्यात त्याने एकूण १९ गडी बाद केले होते. युजवेंद्र चहल हा भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.त्याने ८० सामन्यात ९६ विकेट्स घेतल्या आहेत.एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चहलने ७२ सामन्यात १२१ विकेट घेतल्या आहेत.

Exit mobile version