भारताचा विकेटकीपर, स्फोटक फलंदाज ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंत स्वतः कार चालवत होता. गाडी चालवताना त्याला झोप लागली. यामुळेच कार डिव्हायडरवर आदळली आणि मोठा अपघात झाला. अपघातानंतर तो विंड स्क्रीन तोडून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले. तो खिडकी तोडून बाहेर पडला आणि लगेचच गाडीने पेट घेतला. जर तो वेळेतच खिडकी तोडून बाहेर पडला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती. ऋषभ पंतवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या खेळाडूंचे झाले होते अपघात
मायकेल शुमाकर
फॉम्युला वन चॅम्पियन मायकेल शुमाकरचा अपघात झाला होता. २९ डिसेंबर २०१३ मध्ये शुमाकरचा अपघात झाला होता. त्यानंतर काही वर्ष ते कोमामध्ये होते. सध्या ते व्हिलचेअरवर असून त्यांना चालता-बोलता येत नाहीए.
अँड्र्यू सायमंड्स
इंग्लंड टीमचा माजी ऑलराउंडर अँड्र्यू फ्लिंटॉफचा २०२२ मध्ये भीषण कार अपघात झाला होता. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.
अँड्र्यू फ्लिंटॉफ
इंग्लंडचा माजी ऑलराउंडर अँड्र्यू फ्लिंटॉफचा कार अपघात झाला होता. अपघातानंतर लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु कारचा वेग कमी असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.
कोबे ब्रायंट
बास्केटबॉलचा स्टार खेळाडू कोबे ब्रायंटचा एका हॅलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू झाला होता.
शोएब मलिक
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला शोएबच्या कारने धडक दिली होती. मात्र, या अपघातात शोएब मलिक यांना गंभीर इजा झाली नव्हती.