महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन…

महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन…

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर यवतमाळ जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे. यवतमाळमध्ये कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात २९, जानेवारी महिन्यात २५ मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे.

यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढणाऱ्या तीन ठिकाणाहून रोज प्रत्येकी ५०० याप्रमाणे दिवसाला १५०० नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे, याबाबत विश्लेषण करून डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा. सोबतच खाजगी रुग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याची कारणे याबाबत ऑडीट रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. हाय -रिस्क, लो-रिस्कनुसार लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

हे ही वाचा:

या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे घरं सील…

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर कोरोनाच्या रुग्णाचा आलेख वाढत आहे, त्याचे कारण म्हणजे सोशल डिस्टनसिंग न पाळणे, लग्न समारंभामध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे, आदी नियम पायदळी तुडवल्याने हा आलेख वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version