आयपीएल २०२१ च्या नियमात केले ‘हे’ नवे बदल, वाचा सविस्तर…

आयपीएल २०२१ च्या नियमात केले ‘हे’ नवे बदल, वाचा सविस्तर…

इंडियन प्रीमियर लीग, अर्थात आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची अनेक क्रिकेट चाहते वाट बघत आहेत. आता आयपीएल सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्यांचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आयपीएलच्या या आगामी मोसमात क्रिकेट चाहत्यांना काही नवे नियम बघायला मिळणार आहेत. या स्पर्धेसाठी बीसीलीआय बोर्डाने नवे नियम जारी केले आहेत. या नियमानुसार प्रत्येक संघाला ९० मिनिटात आपला डाव संपवावा लागेल. तसेच बोर्डाने सॉफ्ट सिग्नल हटवण्याचा निर्णयही घेतला आहे. विशेष म्हणजे या नव्या नियमांनुसार चौथ्या अंपायरची ताकद वाढणार आहे.

बीसीसीआयने सर्व आठही संघांना मेल पाठवला आहे. या मेलमध्ये नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या नव्या आदेशानुसार प्रत्येक संघाने ९० मिनिटात डाव आटोपायला हवा. याआधी प्रत्येक डावाची २० वी ओव्हर ९० व्या मिनिटाला सुरु करण्याबाबतचा नियम होता. मात्र, आता वेळेत बदल करण्यात आला आहे. भारत विरुद्ध इंग्लडच्या मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यात सॉफ्ट सिग्नलमुळे बऱ्याच प्रमाणात विवाद निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

संजय राऊत यांची चौकशी करा

पुन्हा एकदा ऑनलाईन सुनावणी घ्यावी; बार असोसिएशनची विनंती

ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल

नव्या नियमानुसार एका तासाला प्रत्येक संघाला सरासरी १४.११ ओव्हर टाकाव्या लागतील. पण यात टाईम-आऊटचा समावेश केला जाणार नाही. खेळासाठी ८५ मिनिट तर टाईम आऊटसाठी ५ मिनिट दिली जातील.

Exit mobile version