भारतीय कार बाजाराला ईव्ही जायंट टेस्लाच्या एंट्रीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा आहे. वाहन निर्मात्या कंपनीने हे शक्य करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, कारण कंपनीला देशातील त्यांच्या चार मॉडेल्सचे उत्पादन किंवा आयात करण्यास मान्यता मिळाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर पोस्टिंगचा संदर्भ देत, ब्लूमबर्गने नोंदवले आहे की, टेस्लाच्या चार मॉडेल्सना भारतीय रस्त्यांवर चालवण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे.
वेबसाईटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, टेस्लाचे चार मॉडेल्स भारतीय बाजारपेठेतील सुरक्षा आणि उत्सर्जन आवश्यकतांशी जुळतात. पोस्टिंगमध्ये असे म्हटले आहे की, “चाचणी हे सुनिश्चित करते की टेस्लाचे वाहन उत्सर्जन आणि सुरक्षा तसेच रस्त्याच्या योग्यतेच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठेतील आवश्यकतांशी जुळते.” टेस्ला फॅन क्लबद्वारे पूर्वी नोंदवल्याप्रमाणे, हे मॉडेल ३ आणि मॉडेल वायचे व्हेरिएंट्स आहेत.
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी यापूर्वी संकेत दिले होते की, जर त्यांनी भारतातील कारखान्यात वाहने आयात केली तर त्यांना बाजाराची माहिती मिळेल. ईव्ही निर्माण करणारी कंपनी आधीच इंपोर्टेड ईव्हीवर कर कमी करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत, कारण हा कर भारतात सर्वाधिक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, एका वायर एजन्सीद्वारे कळवण्यात आले होते की, भारत सरकारने ईव्ही उत्पादकांना स्थानिक खरेदीला गती देण्यास सांगितले आहे आणि कर कपातीच्या मागणीवर विचार करण्यापूर्वी डिटेल्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्स शेयर करण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा:
लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
ईव्ही निर्मात्या कंपनीने केलेल्या कर कपातीच्या मागणीला देशातील इतर ओईएमकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. फोक्सवॅगन आणि ह्युंडईने टेस्लाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे, तर महिंद्राने आयात शुल्काचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. टाटा मोटर्सने येथील केंद्राला सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना समान वागणूक देण्यास सांगितले आहे. परंतु ताज्या निकालांवरून असे दिसून येते की, टेस्ला आता लॉन्चिंच्या अगदी जवळ आहे.