महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. उद्या २० नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी राजधानी मुंबईत ३० हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.
मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत मतदानाच्या दिवशी अतिरिक्त पोलिस आयुक्त स्तरावरील ५ अधिकारी, २० पोलिस उपायुक्त (डीसीपी) आणि ८३ सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) विविध पथकांचे नेतृत्व करणार आहेत. २५ हजारांहून अधिक पोलीस हवालदार, ३ दंगल नियंत्रण पोलीस दल सज्ज राहणार आहेत.
शहरात वाहतूक नियंत्रणासाठी १४४ पोलीस अधिकारी आणि एक हजार पोलीस हवालदार तैनात करण्यात येणार आहेत. ४ हजारहून अधिक होमगार्डही तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (एसएसटी), एफएसटी सहित २६ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF/SAP) तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, उद्या एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
हे ही वाचा :
युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था
वॉन्टेड नक्षल नेता विक्रम गौडा चकमकीत ठार
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पुन्हा मुदतवाढ ?