शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग केल्यानंतर आतापर्यंत दोनवेळाच सुनावणी झाली.दुसऱ्या सुनावणी दरम्यान या प्रकरणी वेळापत्रक तयार करणार असल्याचे सांगण्यात आले.याप्रकरणी आज राहुल नार्वेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, “या विषयावर अधिक बोलणं उचित राहणार नाही. या याचिका ठरवत असताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही. परंतु, कोणत्याही प्रकारची घाईही केली जाणार नाही. ज्यामुळे अन्याय होईल. कालच्या निकालात सुनावणी कशी होणार, त्याची प्रक्रिया काय असणार यासंदर्भातील माहिती सर्व पक्षकारांना दिली आहे. त्याचप्रमाणे ही कारवाई पुढे जाईल. लवकरच यासंदर्भातील निकाल देऊन या विषयाला मार्गी लावू.”
हे ही वाचा:
फरार उद्योगपती नीरव मोदीची उंदीर-घुशींपासून सुटका!
खलिस्तानी दहशतवादी पन्नूनच्या कॅनडाप्रवेशावर बंदीची हिंदू गटाची मागणी
मध्य प्रदेशात १२ वर्षीय मुलीवर बलात्कार
जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात नागरिकांची समिती गठित करावी
मात्र, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतला. परब म्हणाले, अध्यक्ष वेळकाडूपणाचा प्रयत्न करत आहेत.विधानपरिषदेच्या बाबतीतही जुलै मध्ये आम्ही याचिका दाखल केली होती. उपसभापती नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे,विप्लव बाजोरिया यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.आतापर्यंत याबाबत कोणतीही नोटीस नाही आणि सुनवायी नाही.प्रत्येक वेळेला आम्ही सुप्रीम कोर्टात जावं का? यांची हीच अपेक्षा आहे का. आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित करत आक्षेप घेतला.