आजपासून ‘या’ नियमांत होताहेत मोठे बदल

आजपासून ‘या’ नियमांत होताहेत मोठे बदल

आजपासून सप्टेंबर महिना सुरू झाला असून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक बदल लागू करण्यात आले आहेत. नव्या महिन्यापासून अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल झाले आहेत. बँकिंग नियम तसेच एलपीजीच्या किमतींमध्ये बदल या महिन्यांपासून बदल झाले आहेत.

आजपासून काय काय बदल होणार ते पुढील प्रमाणे आहेत

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅसचे दर प्रति सिलिंडर शंभर रुपयांनी कमी झाले आहेत. इंडेनच्या १९ किलो व्यावसायिक सिलिंडर किंमतीत दिल्लीत ९१.५० रुपये, कोलकत्त्यात १०० रुपये, मुंबईत ९२.५० रुपये, चेन्नईत ९६ रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेत निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२२ निश्चित केली होती. या अटीची पूर्तता केली नसेल तर शेतकऱ्यांचा पुढील हप्ता मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

दाऊदला पकडून देणाऱ्याला मिळणार २५ लाख

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

इस्रायल सीरियामध्ये युद्धाचे ढग

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

Exit mobile version