छत्तीसगढमधून नक्षलवाद्यांशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्तीसगढ सरकारच्या धोरणामुळे प्रभावित होऊन राज्यातील नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत आणि समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत.अशीच एक घटना कबिरधाम जिल्ह्यात घडली असून आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवाद्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादन केले आहे.लीवरू उर्फ दिवाकर असे नक्षलवाद्याचे नाव असून त्याने २०२१ साली आत्मसमर्पण केले होते.त्याच्यावर सरकारने तब्बल १४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
छत्तीसगढ कबिरधामचे एसपी अभिषेक पालावा यांनी सांगितले की, १४ लाखांचे बक्षीस असणाऱ्या माओवादी दिवाकरने २०२१ साली आत्मसमर्पण केले होते.तब्बल १८ वर्षे नक्षलवाद्यांच्या संघटनांमध्ये काम केले आहे. तो स्वतःजवळ एके-४७ रायफल बाळगत असे.२०२१ मध्ये त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर त्याने दोन वेळा १० वीची परीक्षा दिली मात्र तो नापास झाला.मात्र, तिसऱ्या वेळा प्रयत्न करून त्याने १० वीच्या परीक्षेत यश संपादन केले.तसेच त्याची पत्नी लक्ष्मी जिच्यावर ८ लाखांचे बक्षीस मोठे ती तीन विषयात पास झाली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.तसेच इतर नक्षलवाद्यांनी लवकरात लवकर आत्मसमर्पण करावे असे आवाहन देखील अधिकाऱ्याने केले.
हे ही वाचा:
तृणमूलनेता पोलिसांच्या ताब्यात; आठवीच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा आरोप
अफगाणिस्तानमध्ये भीषण पाऊस, पुरात ६८ जणांचा मृत्यू
किर्गिझस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांना घरातच थांबण्याच्या सूचना
मालीवाल यांच्यावरील हल्ला जीवघेणा असू शकतो
छत्तीसगढचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी शनिवारी (१८ मे) दिवाकर याच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधत त्यांनी अभिनंदन केले.कबिरधाम पोलिसांच्या [पुढाकाराने आणि मदतीमुळे जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गावातील १०५ विद्यार्थी १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी आनंद व्यक्त केला आहे.