प्युअर व्हेज फ्लीट सेवेच्या ‘टी-शर्ट’ वरून झोमॅटोचा युटर्न!

सर्व डिलिव्हरी बॉय परिधान करणार लाल टी-शर्ट

प्युअर व्हेज फ्लीट सेवेच्या ‘टी-शर्ट’ वरून झोमॅटोचा युटर्न!

झोमॅटोने शाकाहारी ग्राहकांसाठी नुकतीच प्युअर व्हेज फ्लीट सेवा जाहीर केली. या सेवेअंतर्गत झोमॅटोचे डिलिव्हरी पार्टनर आपल्या शाकाहारी ग्राहकांना हिरवे कपडे परिधान करून जेवण घरी पोहोचवणार होते.झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी याची माहिती दिली.सीईओ दीपंदर गोयल यांच्या निर्णयामुळे मात्र सोशल मीडियावर खळबळ उडाली.यामुळे सीईओ दीपंदर गोयल यांना काही तासांतच आपला निर्णय बदलावा लागला.

सीईओ दीपंदर गोयल यांनी मंगळवारी(१९ मार्च) संध्याकाळी या नवीन सेवेची माहिती देताना लोकांना सांगितले की, झोमॅटो ‘प्युअर वेज ग्राहकांसाठी’ एक नवीन सेवा आणत आहे. यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एक डिलिव्हरी पार्टनर आणि तो स्वतः हिरवा ड्रेस आणि ग्रीन बॉक्समध्ये दिसत होता.

झोमॅटोच्या सीईओने त्यांच्या निर्णयामागील कारण सांगितले की, जगात सर्वाधिक शाकाहारी लोक हे भारतात आहेत आणि लोकांच्या प्रतिक्रियांच्या आधारे ही सेवा सुरू करण्यात आली आहे.मात्र, काही वेळातच मोठ्या संख्येने झोमॅटोच्या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली. लोक म्हणाले की, सेवा चांगली असली पाहिजे, हिरवा आणि लाल असा दोन गट केल्याने फायदा होत नाही.

हे ही वाचा:

मुस्लिम आता व्होट बँक राहिलेल्या नाहीत?

बदायूत दोन लहान सख्ख्या भावडांच्या हत्येनंतर वाद!

मजुरांच्या कुटुंबीयांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रफिकचा हिंदूद्वेष जुनाच!

‘मला किंग म्हणून हाक मारू नका’

गोयल यांच्या या निर्णयावर अनेक जणांनी संताप व्यक्त केला.काही जणांनी सोशल मीडियावर म्हटले की, आम्ही व्हेज किंवा नॉन-व्हेज खातो हे समाजातील कोणालाही कळू नये असे आम्हाला वाटते.काही युजर्सने असेही म्हटले आहे की, अशा स्थितीत जे ग्राहक लसूण-कांदाही खात नाहीत, त्यांच्यासाठीही तुम्ही नवीन सेवा सुरू करा.

दरम्यान, प्रचंड विरोधानंतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. कंपनीचे म्हणणे आहे की, आम्हाला याची जाणीव न्हवती.कपड्यांच्या रंगामुळे डिलिव्हरी पार्टनरमध्ये फरक पडू शकतो.अशा परिस्थितीत ही तफावत दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, पूर्वीप्रमाणेच सर्व डिलिव्हरी एजंट लाल कपडे घालणे सुरू ठेवतील.

Exit mobile version