हरियाणात ख्रिसमसचा कार्यक्रम विहिंप, बजरंग दलाने उधळवला, हनुमान चालीसाचे पठण

धर्मांतर केले जात असल्याचा हिंदू संघटनांचा आरोप

हरियाणात ख्रिसमसचा कार्यक्रम विहिंप, बजरंग दलाने उधळवला, हनुमान चालीसाचे पठण

हरियाणाच्या रोहतकमधील स्थानिक गोहाना रोडवर असलेल्या शिव पंजाबी धर्मशाळेत बुधवारी (२५ डिसेंबर) ख्रिसमसच्या कार्यक्रमावरून हिंदू संघटनांनी गोंधळ घातला. ख्रिसमसच्या निमित्ताने येथे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला. या कार्यक्रमात कुस्तीपटू खलीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.  वाढता गोंधळ पाहून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही पक्षांशी बोलून कार्यक्रम रद्द करण्यात आला.

नाताळच्या निमित्ताने शिव पंजाबी धर्मशाळेत ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे लोकही कार्यक्रमाला पोहोचले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. ख्रिसमसच्या निमित्ताने येथे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप करत संघटनांनी गोधळ घातला. नाताळ साजरा करायचाच असेल तर चर्चमध्ये साजरा करावा या ठिकाणी साजरा का करत आहात असा सवाल संघटनांनी उपस्थित केला. यावेळी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंचावर हनुमान चालिसाचे पठण केले.

हे ही वाचा : 

भाजपाला गतवर्षी पेक्षा तीनपट अधिक धनलाभ! २,२४४ कोटी रूपयांच्या देणग्या

ख्रिसमससाठी सांताक्लॉज बनून डिलीव्हरी करता तर, हिंदू सणांच्यावेळी भगव्या रंगाचा पोशाख घालून जाता का?

जम्मू- काश्मीर मधून तीन गो तस्करांच्या आवळल्या मुसक्या; हिंदू- मुस्लिम दंगल भडकवण्याचा होता प्रयत्न

सुप्रिया सुळे म्हणतात, मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमवर जिंकल्या

ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या वतीने बोलताना राकेश म्हणाले की, शिव पंजाबी धर्मशाळेत ख्रिसमस साजरा करण्यात येत होता. दरम्यान, हिंदू संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांनी तेथे पोहोचून कार्यक्रम थांबवला. इथे कोणी धर्मांतर करत नव्हते. ख्रिश्चन समुदायाशी संबंधित असलेल्या शगुनने सांगितले की, गेल्या ५ वर्षांपासून ते येथे कार्यक्रम आयोजित करत आहेत, त्यासाठी धर्मशाळा भाड्याने घेण्यात आली होती. कार्यक्रम होऊ दिला नाही तर धर्मशाळा भाड्याने का देण्यात आली. आम्हाला विरोध करण्यात आला आणि महिलांशीही गैरवर्तन झाले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Exit mobile version