पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये रामनवमीनिमित्त मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची एनआयए मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या एनआयए तपासाची मागणी भाजपने केली आहे. एवढेच नाही तर मुर्शिदाबादमध्ये मिरवणुकीदरम्यान टीएमसी कार्यालयातून रामभक्तांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोपही भाजपने केला आहे.मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर येथील शक्तीपूर भागात रामनवमीच्या मिरवणुकीवेळी काही लोकांनी दगडफेक करत हाणामारीची घटना घडली.या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शक्तीपूर परिसरात काल बुधवारी (१७ एप्रिल) रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली.परिसरातील नागरिक त्यांच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत होते.दगडफेक करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.तसेच रामनवमीच्या मिरवणुकीत स्फोटही झाला, ज्यात एक महिला जखमी झाली. मात्र, हा स्फोट बॉम्बमुळे झाला की, अन्य कोणत्या कारणाने झाला याची अध्याप माहिती समोर आलेली नाही.मेदिनीपूरमध्येही रामनवमीला हिंसाचार झाल्याची बातमी आहे.
हे ही वाचा:
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर!
२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!
रवी किशनची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविरुद्ध पत्नी प्रीती शुक्ला यांची तक्रार!
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, मुर्शिदाबादमध्ये राम भक्तांवर टीएमसी नेत्यांनी टीएमसी पक्ष कार्यालयातून हल्ला केला.गेल्या वेळी न्यायालयाच्या आदेशावर रामनवमी हिंसाचार प्रकरणी एनआयएची तपासणी झाली होती, तशीच तपासणी व्हायला हवी.