…जगात केवळ एकच नरेंद्र मोदी

…जगात केवळ एकच नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. जगभरात नरेंद्र मोदींचे बरेच चाहते आहेत. यात अनेक राष्ट्र प्रमुखांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींचे अनेक देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांबरोबर मैत्रीपुर्ण संबंध आहेत. हे सगळे नेते अनेकदा जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना दिसतात. असाच एक प्रकार नुकसताच ग्लासगो येथे पार पडलेल्या COP२६ बैठकीच्या वेळी पाहायला मिळाला.

स्कॉटलंड मधील ग्लासगो येथे नुकत्याच पार पडलेल्या COP२६ बैठकीत जगभरातील विविध राष्ट्रांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. या परिषदेत वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांनी भाषण करत आपले विचार मांडले. यात युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे देखील होते. बोरिस जॉन्सन यांच्या नंतर भारताचे पंतप्रधान नरेंडनर मोदी हे बोलणार होते. तर आपला भाषणाचा शेवट करताना जॉन्सन यांनी मोदींचे भरभरून कौतुक केले. जसा एक सूर्य, एक जग, एक ग्रीड आहे तसेच जगात पंतप्रधान मोदी हे देखील एकच आहेत असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींना भाषणासाठी मंचावर आमंत्रित केले. एक सूर्य, एक जग, एक ग्रीड हे COP२६ परिषदेचे घोषवाक्य आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात कधी होणार पेट्रोल डिझेलच्या दरात घट?

केदारनाथचा ‘हा’ प्रश्न मार्गी लागला

पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल

भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट

युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या वर्षी जॉन्सन हे भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. पण कोविड महामारीची लाट उसळल्यामुळे ते उपस्थित राहिले नव्हते. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जॉन्सन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे.

Exit mobile version