23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषआमच्या मनात वेगळं काही नाही, आम्ही एनडीएसोबतच!

आमच्या मनात वेगळं काही नाही, आम्ही एनडीएसोबतच!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य

Google News Follow

Related

देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार असून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडत आहेत.राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सव्वासात वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला भारताच्या शेजारील आणि हिंदी महासागर क्षेत्रातील प्रमुख मान्यवर आणि विशेष निमंत्रितांचा समावेश आहे.एनडीएचे सर्व खासदार, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मोदींच्या सोहळ्याला उपस्थित आहेत.तत्पूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कारण यंदा भाजपला बहुमत नसल्याने घटकपक्षही सोबत असणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला एकही कॅबिनेटमंत्रीपद मिळालेलं नाही.याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल आहे.परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत अशा चर्चा सुरु होत्या.मात्र, अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, आमच्या मनात दुसरं काही वेगळं नाहीये.आम्ही एनडीएसोबतच आहोत, असे अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आमची मागणी कॅबिनेट राज्यमंत्रिपद मिळत असल्याने ते आम्ही नाकारलं आहे. प्रफुल्ल पटेल याआधी कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा एक घटक आहे. आम्ही शपथविधीला हजेरी लावणार आहोत. जे. पी. नड्डा यांच्या घरी सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा झाली. मी राष्ट्रावादीचा प्रमुख म्हणून सांगितलं की आमची एक जागा जरी निवडून आली असली तरी दोन ते तीन महिन्यात दोन जागा वाढणार आहेत, असं अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित

जम्मूच्या ज्वेलर्सने नरेंद्र मोदींसाठी बनवले चांदीचे कमळ!

काँग्रेसची ‘खटाखट योजना’ म्हणजे मतदारांना लाच देणे; ९९ खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी

बेपत्ता इंडोनेशियन महिला मृतावस्थेत आढळली अजगरच्या पोटात!

ते पुढे म्हणाले की, सर्वांसोबत मी बोललो त्यानंतर कॅबिनेपद न देता राज्यमंत्रीपद देण्याचं ठरवल्याचं सांगितल. मात्र आमच्या सर्वांचं ठरलं होतं की कॅबिनेटमध्ये एक जागा प्रफुल्ल पटेल यांना ती जागी मिळावी. यावर आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं असून इतर घटकपक्षांनाही राज्यमंत्रीपद देणार आहोत. त्यामुळे तफावत केलं तर योग्य राहणार नाही, असे सांगण्यात आले. त्यावर आम्ही त्यांना सांगितलं की कॅबिनेट मंत्री पद द्यावं नाहीतर आमची थांबण्याची तयारी आहे. थांबण्याची तयारी म्हणजे दुसरं काही आमच्या मनात नाही, मनापासून आम्ही एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील सहा खासदारांना संधी मिळाली आहे.यामध्ये पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांना संधी देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा