चाकरमान्यांनो टोल भरू नका

गणेशोत्सवनिमित्त मुंबई पुणे मार्गावर तात्पुरती टोलमाफी

चाकरमान्यांनो टोल भरू नका

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्यांना तात्पुरती टोल माफी करण्यात आली आहे. या संबंधीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई- पुणे महामार्गावर काम सुरू आहे तसेच गणेशोत्सवानिमित्त लोक बाहेर पडत असतात त्यामुळे या महामार्गावर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हा हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिले असून आजसाठी हा निर्णय लागू असणार आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, बरे झाले मविआ सरकार पडले

न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ

धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम

नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय

शनिवार- रविवार मुंबई पुणे महामार्गावर वाहतूकीची कोंडी असतेच. पण महामार्गावर काम सुरू आहे आणि गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढली आहे. आज सकाळपासूनच मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र होतं. दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अनेकांनी कोल्हापूर किंवा पुणे या मार्गावरुन कोकणात जायला पसंती दाखवली आहे.

Exit mobile version