… म्हणून दिशा सालीयन प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे नेले जाण्याची शक्यता!

दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांचा दावा

… म्हणून दिशा सालीयन प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे नेले जाण्याची शक्यता!

दिशा सालियन हिचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा नव्याने तपास व्हावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. तसेच, त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रारही दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली यांच्यासह आणखी काही जणांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. आता, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

दिशा सालियन प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होणार आहे. मात्र, त्यांच्याविरोधातच तक्रार असल्याचे सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटले आहे. न्यायमूर्तींची बहीण वंदना चव्हाण या सक्रिय राजकारणी असून त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आहेत. त्यामुळे, विविध कारणांमुळे हे प्रकरण न्यायालयाकडूनच दुसऱ्या खंडपीठासमोर घेऊन जा, असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे, असं निलेश ओझा यांनी म्हटलं आहे. तसेच पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्याविरोधात साक्ष देणारे जास्तीत जास्त साक्षीदार हे पोलीस कर्मचारी आहेत, असा दावा निलेश ओझा यांनी केला आहे. परमबीर सिंग यांना मुंबई पोलीसमध्ये सध्या कर्तव्य नको, असे पत्र देणार असल्याचेही निलेश ओझा म्हणाले. न्यायालयानेही तसे आदेश केलेले आहेत. त्यांच्यामुळे पोलिसांच्या कामात व्यत्यय येत असल्याचे निलेश ओझा म्हणाले.

हेही वाचा..

वक्फ विधेयक राष्ट्रहितासाठी का आवश्यक

वक्फ विधेयक मुसलमानांसाठी फायदेशीर

बिहारला आता आरोग्याचे वरदान

अमेरिकन कंपनी म्हणते सोना होईल स्वस्त!

दिशा सालियन हिच्या चेहऱ्यावर, शरीरावर उंचावरून पडूनही जखमा नसल्याबद्दल निलेश ओझा यांना विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, यावर साक्ष देण्यासाठी प्रत्यक्षदर्शी असल्याचे निलेश ओझा म्हणाले. प्रत्यक्षदर्शीची साक्ष आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे निलेश ओझा यांनी म्हटले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव वारंवार समोर येत असताना त्यांच्याचं पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर सालियन यांच्या घरी जातात आणि त्यांना सांगतात की नारायण राणे आणि नितेश राणे यांना शांत करावे लागेल. ते तुमच्या मुलीची बदनामी करत आहेत. हाच राजकीय दबाव त्याकाळी सतीश सालियन यांच्यावर होता, असे निलेश ओझा यांनी सांगितले आहे.

चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चीनी चापट... | Dinesh Kanji | Rahul Gandhi | Xu Feihong | China |

Exit mobile version